Chhatrapati Shivaji High School: छत्रपती शिवाजी हायस्कुल येथे विज्ञान गणित प्रदर्शनास प्रारंभ 

विज्ञान - गणित प्रदर्शन हे विद्यार्थ्याच्या सर्जन शीलतेला वाव देणारे आहे. शाळेच्या चार भिंती बाहेरचे उपक्रम हे प्रेरणा देणारे असून विज्ञानाची कास धरल्यानेच आपल्या देशाची प्रगती झाली असल्याचे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अधीक्षक अंबादास पारखे यांनी केले.

0
छत्रपती शिवाजी हायस्कुल येथे विज्ञान गणित प्रदर्शनास प्रारंभ 

Science – Math Exhibition राहुरी : विज्ञान – गणित प्रदर्शन (Science – Math Exhibition) हे विद्यार्थ्याच्या सर्जन शीलतेला वाव देणारे आहे. शाळेच्या चार भिंती बाहेरचे उपक्रम हे प्रेरणा देणारे असून विज्ञानाची कास धरल्यानेच आपल्या देशाची प्रगती झाली असल्याचे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे (Sri Shivaji Shikshan Prasarak Mandal) अधीक्षक अंबादास पारखे (Ambadas Parake) यांनी केले.

नक्की वाचा : नेवासेत माउलींचा जयघोष करत दीपोत्सव साजरा

पंचायत समिती शिक्षण विभाग, राहुरी तालुका गणित विज्ञान कला संघटना आयोजित व छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज श्री शिवाजीनगर मध्ये  ५१ व्या राहुरी तालुका गणित विज्ञान चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या प्रसंगी पारखे बोलत होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजी कपाळे,आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन विष्णुपंत गीते आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : ‘येत्या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही’ :रवींद्र मोरे   

 या विज्ञान – गणित प्रदर्शनात ६६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. हे प्रदर्शन बघण्यासाठी राहुरी तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. यावेळी राहुरी तालुका विज्ञान संघटनेचे दत्तकुमार चौधरी, विश्वास हंडाळ, सादिक सय्यद, गणित संघटनेचे सुहास महाजन, विष्णुपंत कल्हापुरे, बाबासाहेब शिरसाठ, राजेंद्र सोनटक्के,विशाल तागड, राजश्री वारुळे,मच्छिंद्र देशमुख, शिक्षिका प्रतिनिधी उज्वला दिघे, पर्यवेक्षिका राणी साळवे, शिक्षकेतर प्रतिनिधी भाऊसाहेब पगारे, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषय तज्ञ, केंद्र स्टाफ, सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना व पदाधिकारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जगताप व तांबोळी  यांनी केले तर आभार गणेश विघे यांनी मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here