Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांच्या पुतळ्याचे मनाेज जरांगेच्या हस्ते अनावरण करा; महासभेत मागणी

Chhatrapati Shivaji Maharaj : नगर : नगर महापालिका (AMC) मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा सिंहासनारुढ पुतळा बसवण्यात आला आहे.

0
Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांच्या पुतळ्याचे मनाेज जरांगेच्या हस्ते अनावरण करा; महासभेत मागणी
Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांच्या पुतळ्याचे मनाेज जरांगेच्या हस्ते अनावरण करा; महासभेत मागणी

Chhatrapati Shivaji Maharaj : नगर : नगर महापालिका (AMC) मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा सिंहासनारुढ पुतळा बसवण्यात आला आहे. महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी नगर महापालिकेच्या महासभेत करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : आता नगरमध्ये लवकरच एमआयडीसीची उभारणी; सुजय विखे पाटील

या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन कोल्हापूरचे माजी खासदार संभाजी महाराज भोसले यांच्या हस्ते झाले होते. आज महापालिकेत महासभा सुरू आहे. यात काँग्रेसच्या नगरसेविका चव्हाण यांनी या पुतळ्याचे अनावरण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात यावे, असा ठराव मांडला. या ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी अनुमोदन दिले. या मागणीला नगरसेवक सागर बोरुडे, कुमार वाकळे आदींनी समर्थन दिले आहे.अहमदनगर महापालिकेसमाेर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

नक्की वाचा : शनिशिंगणापूर देवस्थानमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ; शिंदे फडणवीस सरकारची घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here