Chhatrapati Shivaji Maharaj : श्रीरामपूर : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची गेल्या ४० वर्षांपासूनची श्रीरामपूरकरांच्या स्वप्नपूर्तीची अखेर फलश्रृती झाली. सुमारे २० मिनिटांहून अधिकाकाळ सुरू असलेल्या फटाक्यांची अतिषबाजी व रोषणाईत डोळ्यांचे पारणे फेडणारा हा नयनरम्य सोहळा हजारो शिवप्रेमींनी अनुभवला. शिवसेना उपनेते, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या हस्ते व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या अध्यक्षतेखाली या पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण झाले.

अवश्य वाचा : भारताच्या पोरी जगात भारी; विश्वचषकावर कोरलं नाव!
अनेक मान्यवर उपस्थित (Chhatrapati Shivaji Maharaj)
यावेळी आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार डाॅ.सुजय विखे पाटील, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, लहू कानडे, महंत अरुणनाथगिरी महाराज, प्रांताधिकारी किरण सावंत, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दिलीप भालसिंग, उपजिल्हाध्यक्ष दिपक पटारे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारे, आशिष धनवटे, राकेश न्याती, केतन खोरे, सागर बेग, राजेंद्र देवकर, अशोक कानडे, प्रदीप वाघ, बाबा शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
नक्की वाचा : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड



