Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करून त्यांच्या विचारांची खरी शिवजयंती साजरी करावी – नंदकुमार लांगोरे

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करून त्यांच्या विचारांची खरी शिवजयंती साजरी करावी - नंदकुमार लांगोरे

0

Chhatrapati Shivaji Maharaj : कर्जत : सायकल, वाहनांना झेंडा लावणे किंवा दाढी वाढवून पारंपरिक वेशभूषा करणे म्हणजे शिवजयंती नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) असंख्य गुणांपैकी एक गुण जरी आत्मसात करीत तो आचरणात आणला त्यावेळी माझ्या राजाची खरी शिवजयंती साजरी केल्याचे समाधान तुम्हाला-आम्हाला मिळेल असे प्रतिपादन रविशंकर विद्यामंदिराचे (Ravi Shankar Vidya Mandir) प्रमुख कार्यवाहक नंदकुमार लांगोरे (Nandakumar Langore) यांनी केले. ते विद्यामंदिर आयोजित शिवजयंती उत्सव आणि ‘मावळा शपथ व संकल्प’ या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

नक्की वाचा : कॉपी देण्यास विरोध केल्यामुळे होमगार्डला मारहाण; पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कुशल प्रशासक भूमिका सर्वांना मार्गदर्शन करणारी

 कर्जत येथील रविशंकर विद्यामंदिरात पारंपरिक पद्धतीपेक्षा मूल्यावर आधारित कृतींवर भर देत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे प्रमुख कार्यवाहक नंदकुमार लांगोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना लांगोरे म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या विचाराची जयंती साजरी करण्याची आज आवश्यकता आहे. महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना अठरा-पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेत अधर्माच्या विरोधात लढा उभारला. त्यांची कुशल प्रशासक भूमिका आजमितीस सर्वांना मार्गदर्शन करणारी ठरते.

अवश्य वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, 10 दिवसांत अण्वस्त्र करार झाला नाही तर…

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करून त्यांच्या विचारांची खरी शिवजयंती साजरी करावी - नंदकुमार लांगोरे
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात करून त्यांच्या विचारांची खरी शिवजयंती साजरी करावी – नंदकुमार लांगोरे

शिवरायांचा किमान एक गुण तरी आपल्या आचरणात आणावा (Chhatrapati Shivaji Maharaj)

मात्र आपण एका दिवसासाठी केवळ सायकल, वाहनांना झेंडे लावणे, दाढी वाढवणे अथवा पारंपरिक वेशभूषा धारण करीत शिवजयंती साजरी करण्यावर भर देत आहोत. वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिवजयंती दररोज साजरी करण्याचा आपण निश्चय करायला हवा. छत्रपती शिवरायांचा किमान एक गुण जरी आपल्या आचरणात आणून त्यावर जीवन जगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या राजाची खरी शिवजयंती साजरी केल्याचा अभिमान वाटेल. स्वच्छता, शिस्त, प्रामाणिकपणा आणि आदर्श विद्यार्थी बनणे हाच संदेश आज त्यांच्या जयंती दिवशी विद्यार्थ्यानी घ्यावा असे आवाहन केले.

हे वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आरोपी जेरबंद

प्रत्येक विद्यार्थ्यास ‘मावळा संकल्प पत्र’ वितरित

 यावेळी विद्यामंदिरातील सर्व विद्यार्थ्यांना ‘मावळा शपथ’ देण्यात आली. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास ‘मावळा संकल्प पत्र’ वितरित करून त्यावर स्वताचा वैयक्तिक संकल्प लिहिण्यास सांगण्यात आले. संकल्प पत्र हातात घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस चरणस्पर्श करून विद्यार्थ्यांनी संकल्प केला. महाराजांना साक्षी ठेवून घेतलेली शपथ आणि संकल्प यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास विद्यामंदिराच्यावतीने व्यक्त करण्यात आला. यावेळी समाज अभ्यासाचे शिक्षक संजय मडके यांनी शिवाजी महाराजांनी केलेले संकल्प आणि त्याला मावळ्यांनी दिलेला प्रतिसाद अत्यंत रंजक शैलीत विद्यार्थ्यांसमोर मांडला.  पर्यवेक्षक सारिका बनकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले