Chhatrapati Shivaji Maharaj : नगर : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी स्वप्नात येऊन मला बारामती मतदार संघाविषयी (Baramati Lok Sabha Election) दृष्टांत दिला असल्याचे नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांनी सांगितले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा: नगरच्या पहिल्या खासदाराने जनतेसाठी फोडलं होतं सरकारी गोदाम
नामदेव जाधव म्हणाले (Chhatrapati Shivaji Maharaj)
आज पहाटे चार वाजता मला छत्रपती शिवाजी महाराज यांनी दृष्टांत दिला. बारामती मतदारसंघातून सुशिक्षित, सुसंस्कृत चेहरा महाराष्ट्राला मिळावा आणि स्वराज्याचे काम पुढे जावे, अशा प्रकारचा आदेश छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिले आहेत. बारामती मतदारसंघात तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर हे स्वराज्यातील महत्त्वाचे चार किल्ले येतात. समाजाचा उद्धार व किल्ल्यांचा जीर्णोद्धार व्हावा, असा त्यातून संदेश असावा. परवा ३ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिनी दुपारी १२ वाजता पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
नक्की वाचा: उत्कर्षा रुपवते यांच्या रुपाने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात?
स्वराज्य निर्मितीच्या गाभ्याचा प्रदेश (Chhatrapati Shivaji Maharaj)
अनेक वर्षांपासून नागरिक परिवर्तनाच्या प्रतीक्षेत आहेत. अपेक्षित परिवर्तन व्हावे, हीच छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊंची इच्छा असावी. कारण हा स्वराज्य निर्मितीच्या गाभ्याचा प्रदेश आहे. या मतदार संघातील अनेक मावळ्यांना मुंबई, पुण्यातील हॉटलमध्ये वेटर अथवा वॉचमेनचे काम करत आहेत. यापेक्षा दुर्दैव नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊंनी मला संकेत दिला. त्यानुसार मी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. रयत व शिलेदारांच्या बळावर ही निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहोत, असे त्यांनी सांगितले.