Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

0
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Chhatrapati Shivaji Maharaj : कर्जत : येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती उत्सव बुधवारी (ता.१९) भव्य-दिव्य साजरा केला जाणार असून यासाठी शहरातील छत्रपती चौकात आकर्षक व्यासपीठ उभारले असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे (Maratha Society) कर्जत तालुका समन्वयक रावसाहेब धांडे यांनी दिली. जयंती (Shiv Jayanti) उत्सवाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून सोमवारी त्याचा आढावा घेण्यात आला.

नक्की वाचा : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी;’या’ दिवसापर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटांची काउंटर विक्री बंद

भव्य असा गडकिल्ले-दुर्ग असलेला आकर्षक व्यासपीठ

बुधवारी कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख समन्वयक रावसाहेब धांडे यांच्यासह सर्व मराठा सेवकांनी तयारीचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य असा गडकिल्ले-दुर्ग असलेला आकर्षक व्यासपीठ उभारले असून याच ठिकाणी बुधवारी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. यासह संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा निघणार असून यात मुख्य रस्त्यावरील आकर्षक विद्युत रोषणाई, शिवकालीन मर्दानी खेळ, ढोल पथक, लेझीम पथक, हलगी पथक, पारंपरिक संबळ वादन, भजनी मंडळ यासह संगीत प्रेमींसाठी समधुर विंचूर आणि नटराज बँड पथक तसेच पेपर ब्लास्ट व मिरवणुकीसाठी आकर्षक बग्गी रथ यांचा समावेश असणार असल्याची माहिती रावसाहेब धांडे यांनी पत्रकारांना दिली.

अवश्य वाचा : वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी; चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी

पर्यावरण जनजागृती सायकल रॅली पार पडणार (Chhatrapati Shivaji Maharaj)

बुधवारी मराठी मुलांची शाळा येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी होत शोभा वाढवावी, असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे. मंगळवार, दि १८ रोजी सकाळी ७ वाजता सकल मराठा समाज आणि सर्व सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती सायकल रॅली पार पडणार आहे.