Chhatrapati Shivaji Maharaj : नगर : छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) ३९५ व्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता.१९) फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासन, महापालिका (AMC) व रेसीडेन्शियल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर शहरातून जय शिवाजी, जय भारत पदयात्रा काढण्यात आली. यात जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे रेसीडेन्शियल हायस्कूलचे (Residential High School) सुमारे तीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही पदयात्रा सुरू झाली. व रेसिडेन्सी हायस्कूल येथे पदयात्रेची सांगता झाली.
नक्की वाचा : हिंदू धर्म विचाराची सत्ता महापालिकेवर बसविणार : संग्राम जगताप
सर्व ३६ जिल्ह्यामंध्ये जय शिवाजी-जय भारत पदयात्रा
केंद्रीय युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यामंध्ये जय शिवाजी-जय भारत पदयात्रा काढण्यात आली. अहिल्यानगर येथेही आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पदयात्रा पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव विश्वासराव आठरे, जयंत वाघ, डॉ विवेक भापकर, दीपलक्ष्मी म्हसे, बाळासाहेब सागडे, विजयकुमार पोकळे आदींसह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

अवश्य वाचा : वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी; चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी
विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, दांडपट्टा, तलवारबाजी (Chhatrapati Shivaji Maharaj)
अहिल्यानगर महापालिकेने पदयात्रेचे नियोजन करून उपाययोजना केल्या. पदयात्रेत विद्यार्थ्यांचे लेझीम पथक व दांडपट्टा, तलवारबाजी प्रात्यक्षिके नागरिकांची आकर्षण ठरली. रेसिडेन्शियल हायस्कूलचे व इतर शाळांचे विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. माळीवाडा बसस्थानक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या ठिकाणी एलईडी स्क्रीन द्वारे जय शिवाजी जय भारत पदयात्रे बाबत जनजागृती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा वेस, आशा टॉकीज, कापड बाजार, तेलिखुंट, चितळे रस्ता, चौपाटी कारंजामार्गे दिल्लीगेट ते रेसिडेन्सिअल हायस्कूल दरम्यान यात्रेचा समारोप झाला.