Chhatrapati Shivaji Maharaj : कर्जत शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Chhatrapati Shivaji Maharaj : कर्जत शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

0
Chhatrapati Shivaji Maharaj : कर्जत शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
Chhatrapati Shivaji Maharaj : कर्जत शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Chhatrapati Shivaji Maharaj : कर्जत: कर्जत शहर आणि परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० वाजता सकल मराठा समाजाच्यावतीने (Maratha Society) शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख समन्वयक रावसाहेब धांडेसह राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) कन्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रशासकीय, राजकीय, सामजिक, शैक्षणिक, व्यापारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी-जय शिवाजी या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी विविध उपक्रमात सहभागी शाळा आणि सर्व सामाजिक संघटना यांना सन्मानपत्र देत गौरविण्यात आले.

नक्की वाचा : हिंदू धर्म विचाराची सत्ता महापालिकेवर बसविणार : संग्राम जगताप

शिवजयंती उत्सव सोहळा विविध उपक्रमांनी साजरा

कर्जत शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने शिवजयंती उत्सव सोहळा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मंगळवारी सकाळी ७ वाजता सकल मराठा समाज कर्जत आणि सर्व सामाजिक संघटनेच्यावतीने पर्यावरण जनजागृती सायकल रॅली शहराच्या विविध मार्गवरून पार पडली. यात शालेय विद्यार्थ्यांसह श्रमप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सायकल रॅलीस प्रमुख समन्वयक रावसाहेब धांडे यांनी भगवा झेंडा दाखवत प्रारंभ केला. तर संध्याकाळी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात गड-किल्ले-दुर्ग व्यासपीठावर दीपोत्सव साजरा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेस दिव्यांनी उजळून टाकले होते.

अवश्य वाचा : वांजोळीत दाणी वस्तीवर जबरी चोरी; चोरट्यांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी

विद्यार्थ्यांची जय शिवाजी-जय भारत पदयात्रा (Chhatrapati Shivaji Maharaj)

बुधवारी सकाळी ८ वाजता शासनाच्या आदेशानुसार दादा पाटील महाविद्यालयाच्या एनसीसी छात्र, एनएसएस यासह आदी विद्यार्थ्यांची जय शिवाजी-जय भारत पदयात्रा प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. या यात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. तर सकाळी १० वाजता सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांसह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिनव युवा प्रतिष्ठान आणि सकल मराठा समाज कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात अनेकांनी रक्तदान करीत शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त शहरातील मुख्य रस्ता भगवामय झाला होता. शिवजयंतीचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज चौकात उंच असा ‘स्वराज्य ध्वज” उभारण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी समन्वयक रावसाहेब धांडे यांनी सर्वांचे आभार मानले.