Chhatrapati Shivaji Maharaj : अकोलेत शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी पुस्तके व वह्यांचे वितरण

Chhatrapati Shivaji Maharaj : अकोलेत शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी पुस्तके व वह्यांचे वितरण

0
Chhatrapati Shivaji Maharaj : अकोलेत शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी पुस्तके व वह्यांचे वितरण
Chhatrapati Shivaji Maharaj : अकोलेत शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी पुस्तके व वह्यांचे वितरण

Shiv Jayanti : अकोले : येथील श्री शिवशंभू प्रतिष्ठान आणि हिंदुराजा फाउंडेशन यांच्यावतीने शिवरायांचे विचार व कार्य तळागळात पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (Zilla Parishad Primary School) येथील विद्यार्थ्यांना (Students) प्रेरणादायी पुस्तके व वह्यांचे वितरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) विचार शालेय विद्यार्थी, तरूणांपर्यंत जावे व या कार्याच्या माध्यमातून तरूणांनी शिवरायांच्या विचारांना गती द्यावी, या हेतूने प्रतिष्ठानच्यावतीने राज्यात अंबाजोगाई, वडूज सातारा, पुणे-पिंपरी चिंचवड, जळगाव (जामोद) बुलढाणा, अकोले (अहिल्यानगर), कोरेगाव (सातारा) याठिकाणी कार्यक्रम घेण्यात येवून शिवरायांच्या विचारांचा जागर केला. शिवरायांचे गडकिल्ले यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत जावी व शाळेतील विद्यार्थ्यांना आपला इतिहास व छत्रपतींचे कार्य माहिती व्हावे व त्यांचे विचार त्या बालमनात रूजवावे त्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात स्वप्नील कारखानीस यांच्यावतीने गडकिल्ल्यांच्या चित्रावर आधारित वह्या व पुस्तकांचे वितरण करण्यात आले.

नक्की वाचा : जूनपासून देशातील शिक्षण पद्धतीत ‘हे’ होणार बदल

पुढच्या पिढीला प्रेरणा प्राप्त होईल (Chhatrapati Shivaji Maharaj)

दरम्यान, शिवजंयती निमित्ताने काही संकल्प करण्यात आले. ज्यामध्ये शिवजयंती नाचून नाही तर वाचून हा संकल्प हाती घेण्यात आला आहे. वैचारिक शिवजयंती साजरी करण्यासाठी प्रतिष्ठानाने शाळा निवडल्या जेणेकरून पुढच्या पिढीला प्रेरणा प्राप्त होईल. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचार कार्याबरोबरच गडकिल्ले यांची स्वच्छता राहावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले. हा संकल्प तरूणांसाठी असल्याने तरूणांनी या संकल्पात सहभागी होण्याचे व त्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन श्री शिवशंभू प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले आहे.