Chhatrapati Shivaji Maharaj : संगमनेर : अत्यंत उत्कृष्ट सजावट, विद्युत रोशनाई, मैदानी खेळ, आतिषबाजी आणि भगवे वातावरण यामुळे सजलेल्या संगमनेर बसस्थानक परिसरात अलोट गर्दीत व मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) भव्य मंदिराचा देखावा माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) व आमदार तांबे यांच्या उपस्थितीत खुला करण्यात आला. यावेळी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन आदर्श राज्य व समाज निर्माण करण्याचे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, सर्व संत यांचे विचार घेऊन आपण पुढे जात असल्याचे प्रतिपादन थोरात यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीत होणारे राजकारण (Politics) हे दुर्दैवी असल्याची टीका आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी केली.

नक्की वाचा : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर
मंदिर देखाव्याचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते
संगमनेर हायटेक बस स्थानक परिसरात स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराच्या देखाव्याचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समवेत माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, कांचन थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्री थोरात, डॉ.मैथिली तांबे, सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक, गणेश मादास, निखिल पापडेजा, किशोर टोकसे, वैष्णव मुर्तडक, शरयू देशमुख, अमर कातारी, नितीन अभंग, सुनिल मादास, राणी प्रसाद मुंदडा, जीवन पंचारिया, शुभम पेंडभाजे मनिष राक्षे, हृतिक राऊत, रमेश नेहे आदींसह संगमनेर शहरांमधील सर्व संघटना विविध राजकीय पक्ष, सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा : ‘आरडी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित;२१ मार्चला चित्रपट होणार प्रदर्शित
पारंपारिक दांडपट्टा, तलवारबाजी आदी खेळ (Chhatrapati Shivaji Maharaj)
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ढोल ताशांच्या गजरात माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे बसस्थानकावर आगमन झाले. पारंपारिक दांडपट्टा, तलवारबाजी आदी खेळ झाल्यानंतर आई तुळजाभवानीची आरती करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीनंतर मंदिर खुले करण्यात आले. यावेळी प्रचंड आतिषबाजी करण्यात आली.