Chhatrapati Shivaji Maharaj : कोपरगाव : राहुरी येथील बुवा सिंद बाबा तालमीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून सदर घटनेचे तीव्र पडसाद कोपरगावात (Kopargaon) पहावयास मिळाले आहे. आज (ता.२७) सकल मराठा समाजाच्या (Total Maratha Society) वतीने कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी सदर घटनेचा तीव्र निषेध (Protest) करण्यात आला.
नक्की वाचा : बीड जिल्हा रुग्णालयातील बडा डॉक्टर निलंबित;विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची घोषणा
आरोपीला कडक शासन करण्याची मागणी
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विधिवत महाअभिषेक करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. या घटनेतील आरोपीला तत्काळ शोधून कडक शासन करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आली आहे. सदरचे निवेदन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना देण्यात आले आहे.
अवश्य वाचा : माध्यमिक शिक्षक सोसायटीत ‘परिवर्तन’
निवेदनाद्वारे मागणी (Chhatrapati Shivaji Maharaj)
राज्यातील महापुरुषांच्या स्मारक विटंबनांच्या घटना लक्षात घेता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासह सर्वच महापुरुषांच्या स्मारक परिसरात अद्यावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, तसेच सर्व ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक तैनात करण्यात यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे सकल मराठा समाजाच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्याकडे करण्यात आली आहे. सदर मागणीबाबत मुख्याधिकारी जगताप यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावेळी अनिल गायकवाड, विनय भगवत, भरत मोरे, योगेश खालकर, बबलू वाणी, अमित आढाव, बालाजी गोर्डे, मारुती जपे, दीपक साळुंखे, अमोल शेलार, साई नरोडे, प्रवीण देशमुख, चंद्रशेखर म्हस्के, प्रतीक कावळे, निलेश वाणी आदीसह सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.