Chhava : अहिल्यानगर : नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या पार पडत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मराठी भाषेचे कौतुक केले. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये बोलत असताना त्यांनी मध्ययुगीन काळापासून ते अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होईपर्यंतच्या महत्त्वाच्या घटनांचा आणि महापुरूषांचा उल्लेख करून त्यांना वंदन केले. मुंबईमुळेच मराठी आणि हिंदी चित्रपटांना उभारी मिळाली. आणि सध्या तर ‘छावा’ची (Chhava) धूम आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणताच सभागृहात एकच जल्लोष झाला.
अवश्य वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक का मानले जाते?
दिल्लीच्या विज्ञान भवनात जय भवानी, जय संभाजी अशा घोषणा
त्यांच्या छावाबद्दल केलेल्या वक्तव्याला टाळ्यांच्या कडकडाट करत उपस्थितांनी दाद दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘छावा’ चित्रपटाचा उल्लेख करताच दिल्लीच्या विज्ञान भवनात जय भवानी, जय संभाजी अशा घोषणा दिल्या गेल्या. यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कांदबरीने करून दिला.

नक्की वाचा : जूनपासून देशातील शिक्षण पद्धतीत ‘हे’ होणार बदल
मराठी साहित्या बद्दल गौरवोद्गार (Chhava)
मराठी मातीत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पहिले बाजीराव पेशवे यांनी त्याकाळात शत्रूंना पराभूत करून जेरीस आणले. यांच्यासह स्वातंत्र्यात योगदान असलेले व ब्रिटिशांविरोधात लढा देणारे वासूदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर सारख्या सेनानींनी ब्रिटिशांची झोप उडवली. केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी भाषेला आकार दिला. मराठी साहित्यातून राष्ट्रप्रेमाचा ज्वर दिसून आला. संपूर्ण राष्ट्राची मशागत मराठी साहित्याने केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.