Chief Minister : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या शिर्डीत महिला सशक्तीकरण मेळावा

Chief Minister : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या शिर्डीत महिला सशक्तीकरण मेळावा

0
Chief Minister : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या शिर्डीत महिला सशक्तीकरण मेळावा
Chief Minister : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या शिर्डीत महिला सशक्तीकरण मेळावा

Chief Minister : नगर : मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या (ता.२७) रोजी शिर्डी येथे महिला सशक्तीकरण मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

नक्की वाचा: मोठी बातमी! पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

जिल्ह्यातील ११ लाख ५२ हजार ४५६ महिलांचे अर्ज

महिलांना दरमहा आर्थिक लाभ देणारी तसेच कुटुंबात महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११ लाख ५२ हजार ४५६ महिलांचे अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. शासनाने सुरू केलेल्या या योजनेमुळे महिला भगिनींमध्ये उत्साहाचे वातावरण संपूर्ण जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.

अवश्य वाचा: मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज

योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये अधिकारी (Chief Minister)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून योजनेला गती मिळाली. या योजनेंतर्गत अकोले तालुक्यात ७६ हजार ४७१ महिलांचे अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले. संगमनेर तालुक्यात १ लाख ३१ हजार ८८, कोपरगाव ७६ हजार १०८, श्रीरामपूर ७३ हजार ३६३, नेवासे ९४ हजार ७८२, शेवगाव ६० हजार ४४७, पाथर्डी ६३ हजार ८११, जामखेड ४१ हजार ७६५, कर्जत ६० हजार ५२८, श्रीगोंदे ७९ हजार १२३, पारनेर ६९ हजार १४२, राहुरी १ लाख २६ हजार १६१, राहाता ८५ हजार २३० तर नगर तालुक्यामध्ये १ लाख १४ हजार ४३७ महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत.

योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ८ लाख २४ हजार ७२० महिलांना २४७ कोटी ४१ लाख ६० हजार रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आला आहे. उर्वरित पात्र महिलांना पुढील टप्प्यात जुलै २०२४ पासून दरमहा रुपये १ हजार ५०० प्रमाणे तीन महिन्यांचा लाभ देण्यात येणार आहे. शुक्रवारी शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महिला व बालविकास विभागातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here