Chief Minister : नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून तालुक्यातील विविध विकास कामाचा प्रारंभ तसेच अण्णा हजारे यांच्या नावाने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ति आणि संस्थाना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचा वितरण सोहळा मुख्यमंत्री (Chief Minister) देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.
अवश्य वाचा : अरेच्चा! सरकारच्या २६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी
राळेगण येथे अधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक
यासंदर्भात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत राळेगण येथे वरीष्ठ अधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा, ठिकाण आणि अन्य नियोजनाबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
नक्की वाचा : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोलमाफी;एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित (Chief Minister)
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, भाजपचे अध्यक्ष राहुल शिंदे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राळेगण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, सौर उर्जा प्रकल्प कृष्णा पाणी पुरवठा योजना, जलजीवन योजना, जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.