
Chief Minister Devendra Fadnavis : नगर : महानगरपालिका निवडणूकीतील (Ahilyanagar Municipal Corporation Election) भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या (BJP-NCP Alliance) उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) हे अहिल्यानगरमध्ये येत आहेत. गुरुवारी (ता.८) त्यांची शहरात जाहीर सभा होणार आहे. शहरातील मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील पांजरपोळ मैदानात दुपारी १ वाजता ही जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते (Anil Mohite) यांनी दिली.
अवश्य वाचा: अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर : रवींद्र चव्हाण; युतीच्या प्रचाराला प्रारंभ
नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन (Chief Minister Devendra Fadnavis)
अधिक माहिती देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेसाठी राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नक्की वाचा : निवडणुकीत ‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास काय होणार ?


