Chief Minister Devendra Fadnavis : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

Chief Minister Devendra Fadnavis : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

0

Chief Minister Devendra Fadnavis : नगर : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत (Ahilyanagar Municipal Corporation Election) भाजपचे (BJP) तीन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे (Nationalist Congress Party (Ajit Pawar)) दोन असे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. युतीची सुरुवात चांगली झाली आहे. चांगली सुरुवात चांगले यश मिळवून देते. या निवडणुकीत युतीचाच महापौर अहिल्यानगर महापालिकेत बसेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युतीच्या उमेदवार प्रचारासाठी आयोजित सभेत ते आज (ता. ८) बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जयदीप कवाडे, अशोक गायकवाड यांच्यासह दोन्ही पक्षांचे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.

अवश्य वाचा: पोस्टल बॅलेटसाठी १०० टक्के मतदानाचे उद्दिष्ट; यशवंत डांगे

देवेंद्र फडणवीस म्हणाले,

मागील ७० वर्षांत ग्रामीण भागाच्या विकासावर भर देण्यात आला. मात्र, रोजगारासाठी लोक शहरांकडे येत राहिले. त्यामुळे शहरामध्ये लोकसंख्या वाढली. पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या. कचऱ्याचे ढीग, मलनिस्सारणाच्या समस्या निर्माण झाल्या. शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य वाढले होते. २०१४मध्ये जेव्हा भाजपची सत्ता आली, तेव्हा शहरे तसेच अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांच्या विचार करत शहर विकासाच्या कामे हाती घेण्यात आली. अमृत भुयार गटार योजना, फेज दोन पाणी योजना, पंतप्रधान आवास योजना अशा विविध योजनांतून शहर विकासाला चालना देण्यात आली.

नक्की वाचा: रेल्वे ट्रॅकवर सापडलेल्या व्यक्तीचा मृत्यू; तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद

शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही (Chief Minister Devendra Fadnavis)

प्रधानमंत्री आवास योजनेतून ३० लाख घरे देण्यात आली आहेत. झोपडपट्टी तसेच अतिक्रमण झालेल्या जागेचा सर्वे करून त्यांना त्याच ठिकाणी घरे दिली जातील अशी योजना आपण आगामी काळात आणणार आहोत. अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी तुम्ही आम्हाला प्रस्ताव पाठवा आम्ही तुम्हाला कुठलाही निधी कमी पडू देणार नाही.

Chief Minister Devendra Fadnavis : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
Chief Minister Devendra Fadnavis : अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी ४९२ कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. युतीचा महापौर बसल्यास तुम्ही एक महिन्याच्या आत प्रस्ताव पाठवा. विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

अवश्य वाचा : ले ग्रँड रेक्समध्ये एस. एस. राजामौली यांच्या ‘वाराणसी’ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद

अहिल्यानगर शहराच्या शहर विकास कृती आराखड्यातील रस्त्यांसाठी ३५० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. तसेच क्रीडा संकुलासाठी तुम्ही प्रस्ताव पाठवा तुम्हाला निधीची कमतरता भासू देणार नाही. रोजगारासाठी एमआयडीसीचा विकास करू. नॅशनल डिफेन्स कॉरीडोर या माध्यमातून अहिल्यानगर एमआयडीसीचा विकास होणार आहे. शहरे स्वच्छ झाली पाहिजे यासाठी स्वच्छ भारत अभियान हे राबवण्यात येत आहे. त्यासाठी आपण भरघोस निधीही देत आहोत.

सिस्पे प्रकरण

काही लोकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून गरीब लोकांना लुबाडून मोठमोठे घोटाळे केले आहेत. त्यांची सीबीआय चौकशी केली जाईल. त्यांना जेलची हवा खायला पाठवून गरिबांचे पैसे त्यांना परत मिळूवून देऊ.

लाडकी बहीण योजना सुरूच राहील

जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. तोपर्यंत तुमची लाडकी बहीण योजना सुरूच राहील. अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून लाडक्या बहिणींना लखपती योजनेच्या मार्फत हातभार लावायचा आहे, असे त्यांनी सांगितले.