
Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan : श्रीगोंदा : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’ची (Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan) प्रभावी अंमलबजावणी बनपिंपरी ग्रामपंचायतीमध्ये होताना दिसत आहे. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्याच्या गट विकास अधिकारी राणीताई फराटे यांनी नुकतीच या गावाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान राणीताई फराटे यांच्या हस्ते गावातील नूतन व्यायामशाळा आणि स्वामी विवेकानंद वाचनालयाचे (Swami Vivekananda Library) उद्घाटन करण्यात आले. युवकांच्या आरोग्यासाठी व्यायामशाळा आणि ज्ञानात भर पडण्यासाठी वाचनालय हे समृद्ध गावचे लक्षण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
नक्की वाचा: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर

विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक
गट विकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील परसबागेची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच, ग्रामस्थांना प्रशासकीय सेवा सुलभ व्हाव्यात यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रा’ची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी मार्गदर्शन करताना राणीताई फराटे म्हणाल्या की, “अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आनंद भंडारी साहेब व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मा. गुंजाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अभियानाचे काम जोमाने सुरू आहे. ५ कोटींच्या बक्षिसाची सुवर्णसंधी गाठण्यासाठी बनपिंपरीने दिलेला भर कौतुकास्पद आहे.”
अवश्य वाचा: अजितदादांच्या आठवणींनी संगमनेर भावूक; शोकसभेत सर्वपक्षीय नेते एकवटले
अभियानाच्या तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन (Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan)
याप्रसंगी विस्तार अधिकारी मा. अस्वर मॅडम यांनीही अभियानाच्या तांत्रिक बाबींवर अनमोल मार्गदर्शन केले. बनपिंपरीचे सरपंच श्री. गौतम पठारे यांनी सांगितले की, “जिल्हा परिषद सदस्य ॲड .श्री. सचिनभाऊ जगताप यांच्या खंबीर नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीचे कामकाज प्रभावीपणे चालू असून प्रशासनाच्या सहकार्यामुळे गाव प्रगतीकडे कूच करत आहे.”
या कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच श्रीम. शशिकला भगवान जगताप, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. प्रियंका भोर, प्राथमिक शिक्षक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


