Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan : नगर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातर्गत (Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan) अहिल्यानगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा (Manjarsumba) येथे शासनाच्या पथकाने गावातील विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी गावात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे चित्रीकरण व फोटोग्राफी करण्यात आली. गावातील श्रमदान, वाचनालय, परसबाग, अंगणवाडी, जनावरांचे गोठे, गावातील स्वच्छता आणि जिल्हा परिषद शाळेचा (Zilla Parishad School) विकास या माध्यमातून झालेला गावाचा कायापालट शासनाच्या कॅमेऱ्यात टिपण्यात आला.
नक्की वाचा: कोपरगाव बसस्थानकात थरार; ब्रेक फेल झाल्याने बस चढली थेट फलाटावर
स्वच्छ आणि आत्मनिर्भर गाव निर्माण करण्याचा निर्धार
मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत स्वच्छ, सुंदर आणि आत्मनिर्भर गावाचा आदर्श निर्माण करण्याचा जो निर्धार मांजरसुंबा ग्रामस्थांनी केला आहे, त्याचे राज्यस्तरावर सादरीकरण करण्यात येणार आहे. शासनाच्या या पाहणीमुळे गावातील सर्वसामान्य ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निमित्ताने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात राष्ट्रीय पोषण अभियान आणि पौष्टिक तृणधान्य यावर आधारित शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि पशुपालन या विषयांवर मार्गदर्शन देण्यात आले.
हे देखील वाचा: अजितदादांच्या पक्षातील मंडळी पुढील राजकारण कसं करणार?
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजित (Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan)
यावेळी गावातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले, तर आयुष्मान भारत योजनेअंतर्गत महिलांची आरोग्य तपासणी शिबिरे उत्साहात पार पडली. गावातील महिलांसाठी विविध सांस्कृतिक आणि मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांमुळे गावामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
या वेळी उपस्थित विस्तार अधिकारी रामदास दळवी, सरपंच रूपाली कदम, उपसरपंच जालिंदर कदम, ग्रामपंचायत सदस्य किरण कदम, प्रशांत कदम, मंगल कदम, कविता वाघमारे, तंटामुक्ती अध्यक्ष इंद्रभान कदम, ग्रामविकास अधिकारी सारिका वाळुंज, तलाठी कविता जाधव, कृषी सहाय्यक सुविधा वाणी, पशुवैद्यकीय अधिकारी पी.एस. कुसळकर, यशवंत भुतकर, काशिनाथ मते, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच रूपाली कदम म्हणाल्या, “शासनाच्या विविध योजना राबविण्यात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग मिळत आहे. यामुळे गावातील प्रत्येक घटक प्रगत होत आहे. गेल्या वीस वर्षांपासून शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविल्यामुळे मांजरसुंबा हे गाव आज ‘आदर्श गाव’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. ग्रामस्थांच्या एकीमुळेच हा यशस्वी प्रवास शक्य झाला.



