Child Marriage : टाकळी ढोकेश्वर येथे बाल विवाहमुक्त गाव व शाळा अभियान 

Child Marriage : टाकळी ढोकेश्वर येथे बाल विवाहमुक्त गाव व शाळा अभियान 

0
Child Marriage : टाकळी ढोकेश्वर येथे बाल विवाहमुक्त गाव व शाळा अभियान 
Child Marriage : टाकळी ढोकेश्वर येथे बाल विवाहमुक्त गाव व शाळा अभियान 

Child Marriage : पारनेर: तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर (Takli Dhokeshwar) येथील श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पारनेर पोलीस स्टेशन, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मिडिया (Mumbai Digital Media), आणि स्नेहालय (Snehalaya) संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बाल विवाह मुक्त गाव व बाल विवाह (Child Marriage) मुक्त शाळा अभियानाचा प्रारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला.

नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप यांच्या जीवितास धोका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी

बाल विवाहांना आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे

या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाल विवाहासारख्या सामाजिक समस्येवर उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले. सध्या फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या जमान्यात बाल विवाहाचे प्रमाण वाढत असून, ही बाब सामाजिक चिंतेची बनली आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन अशा विवाहांना आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी स्नेहालय संस्था नेहमीच एक पाऊल पुढे राहील, असे मत स्नेहालय प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी होते. यावेळी पारनेर पोलिस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल संदीप गायकवाड, पोलिस कॉन्स्टेबल शिंदे, स्नेहालय रेडिओ स्टेशनचे प्रमुख संदीप क्षीरसागर, उडाण प्रकल्पाच्या समुपदेशक निशा वाघ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, पारनेर तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे, प्राचार्य बाळासाहेब खिलारी, पत्रकार संजय मोरे, पर्यवेक्षक मनिषा गाडगे, पत्रकार संतोष कोरडे, गणेश जगदाळे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अवश्य वाचा : अमराठी व्यावसायिकांची मनसेविरोधात एकजूट, मीरा भाईंदरमध्ये मारहाणीवरुन आक्रमक

टाकळी ढोकेश्वर बालविवाह मुक्त करण्याचा निर्धार (Child Marriage)

या अभियानाच्या निमित्ताने विद्यालय परिसरात वृक्षारोपणाचाही उपक्रम राबवण्यात आला, ज्यामुळे पर्यावरण संरक्षणाचा संदेशही देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य बाळासाहेब खिलारी यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. भाऊसाहेब हिंगडे यांनी आणि आभार प्रदर्शन जाधव यांनी केले. बाल विवाहासारख्या सामाजिक समस्येविरुद्ध जनजागृती करण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात. या अभियानामुळे टाकळी ढोकेश्वर गाव आणि शाळा बालविवाह मुक्त करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल पुढे टाकण्यात आले आहे.