Child Protection Committee : बालकांचे भविष्य ही समाजाची जबाबदारी : प्रवीण कदम

Child Protection Committee : बालकांचे भविष्य ही समाजाची जबाबदारी : प्रवीण कदम

0
Child Protection Committee : बालकांचे भविष्य ही समाजाची जबाबदारी : प्रवीण कदम
Child Protection Committee : बालकांचे भविष्य ही समाजाची जबाबदारी : प्रवीण कदम

Child Protection Committee : पारनेर : बालकांचे भविष्य सुरक्षित करणे ही केवळ शासन किंवा कायद्याची जबाबदारी नसून ती समाजाची सुद्धा जबाबदारी आहे. असे आवाहन स्नेहालय उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम (Praveen Kadam) यांनी केले आहे.आजच्या काळात गाव, शाळा आणि समाज पातळीवर बालकांवरील अत्याचार,बालविवाह (Child Marriage) आणि बालमजुरी यांसारख्या समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक गावात आणि शाळेत केवळ ‘बाल संरक्षण समिती’ (Child Protection Committee) स्थापन करून न थांबता, ती सक्रिय आणि कृतीशील असणे काळाची गरज बनली आहे.अनेक ठिकाणी बाल संरक्षण समित्यांची स्थापना केवळ शासकीय आदेशानुसार कागदोपत्री झालेली दिसते. मात्र, जोपर्यंत या समित्यांचे सदस्य संवेदनशील आणि जागरूक होऊन प्रत्यक्ष काम करत नाहीत, तोपर्यंत बालहक्कांचे संरक्षण होणे कठीण आहे.

नक्की वाचा : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेतील रस्त्यांची गुणवत्ता तपासणार

दर महिन्याला नियमित बैठका होणे गरजेचे

शाळाबाह्य मुलांचा प्रश्न असो किंवा छुप्या पद्धतीने होणारे बालविवाह, यावर वेळीच लगाम लावण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्षम यंत्रणा असणे आवश्यक आहे. समितीची केवळ स्थापना न करता दर महिन्याला नियमित बैठका होणे गरजेचे आहे. गावात किंवा परिसरात अशा मुलांची यादी तयार करणे, ज्यांना संरक्षणाची अधिक गरज आहे (उदा. अनाथ मुले, स्थलांतरित मुले) संकटकाळात बालकाला तातडीने मदत मिळवून देण्यासाठी समितीने तत्पर राहावे.

अवश्य वाचा : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यातील संघर्षाने जागतिक व्यापारात मोठे वादळ

नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन (Child Protection Committee)

पोलीस प्रशासन, बालकल्याण समिती (CWC) आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी थेट संपर्क आणि समन्वय असावा.समिती स्थापन झाल्यानंतर ती ‘थंड बस्त्यात’ पडू नये यासाठी जागरूक नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींवर भर देणे आवश्यक आहे बैठकीत झालेल्या निर्णयांची रीतसर नोंद करून त्यावर काय कार्यवाही झाली, याचा पाठपुरावा करावा. बालकांच्या प्रश्नांवर केवळ बंद दाराआड चर्चा न करता, ग्रामसभा आणि शाळांमधील पालक सभांमध्ये उघडपणे बोलले पाहिजे.

हे देखील वाचा : सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

बालपण जपण्यासाठी कायद्यापेक्षा समाजाची संवेदनशीलता महत्त्वाची

‘चाइल्ड हेल्पलाईन १०९८’ बद्दल मुलांमध्ये आणि पालकांमध्ये माहिती पसरवणे “बालपण जपण्यासाठी कायद्यापेक्षा समाजाची संवेदनशीलता अधिक महत्त्वाची आहे. जेव्हा समाजातील प्रत्येक घटक स्वतःला ‘बाल रक्षक’ समजेल, तेव्हाच आपले गाव आणि शहर बालस्नेही होईल. आपल्या आजूबाजूला बालमजुरी किंवा बालविवाह होत असल्याचे आढळल्यास केवळ प्रेक्षक न राहता, स्थानिक समितीला किंवा प्रशासनाला कळवावे. ही समिती आपल्या हक्काची आहे, हे जनतेने समजून घेणे गरजेचे आहे. शासन, प्रशासन आणि समाज जेव्हा एकत्रितपणे काम करतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने बालकांचे सर्वांगीण संरक्षण होईल.