Child Sexual Abuse : तीन अल्पवयीन मुलींना पळवून त्यांच्याशी अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा

Child Sexual Abuse : तीन अल्पवयीन मुलींना पळवून त्यांच्याशी अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा

0
Child Sexual Abuse : तीन अल्पवयीन मुलींना पळवून त्यांच्याशी अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा
Child Sexual Abuse : तीन अल्पवयीन मुलींना पळवून त्यांच्याशी अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा

Child Sexual Abuse : नगर : चाइल्ड लाइन (Child Line) संस्थेचा कर्मचारी असल्याची बतावणी करून तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेवून त्यांच्याशी अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपीस दोषी धरून विशेष जिल्हा न्यायाधीश (District Judge) माधुरी एच मोरे यांनी आरोपीस बाललैंगिक अत्याच्यारापासून (Child Sexual Abuse) संरक्षण कायद्यानुसार दोषी धरून चार वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व तीन हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सोमनाथ उर्फ ऋषिकेश एकनाथ हापसे (वय ३२, रा. उंबरे, ता. राहुरी), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील मनीषा केळगेंद्र (Manisha Kelgandre) यांनी पाहिले.

अवश्य वाचा : राज्यात लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती,प्रकरण नेमकं काय ?

याबाबत हकीकत अशी की,

फिर्यादी यांच्या अल्पवयीन लहान बहीण व तिच्या दोन अल्पवयीन मैत्रिणी या १३ सप्टेंबर २०२३ रोजी शाळेत जातो म्हणून घरातून बाहेर पडल्या. मात्र, परत घरी आल्या नाही. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पूनम श्रीवास्तव यांनी करून तीनही अल्पवयीन मुली हैद्राबाद येथून ताब्यात घेतल्या. त्यांच्या जबाबावरून आरोपी सोमनाथ एकनाथ हापसे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. मी चाईल्ड लाईनचे काम करतो मी तुम्हाला मदत करतो, असे म्हणून त्यांना रूमवर घेऊन गेला. तेथे त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर दुसऱ्यादिवशी अल्पवयीन मुली हैद्राबाद ला गेल्या. हैद्राबाद व तोफखाना पोलिसांनी अल्पवयीन मुलींना तात्कळ ताब्यात घेतले.

नक्की वाचा : राज्यातील देवस्थानच्या जमिनींच्या खरेदी विक्री बंद; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले (Crime)

या घटनेचा संपूर्ण तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, अल्पवयीन पिडीत मुली, पंच साक्षीदार, मुख्याध्यापक, वैदयकिय अधिकारी, तपासी अधिकारी, तसेच वया संदर्भात अहमदनगर महापालिकेचे माहितगार इसम यांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला संपूर्ण पुरावा ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी महिला पोलीस अडसुळ, तसेच मुश्ताक शेख, ए. एस. आय. नितीन गायकवाड यांनी सहकार्य केले.