नगर : वीजनिर्मितीसाठी केलेला नवा जुगाड, सेंद्रिय शेतीची महती (Organic Farming), पालेभाज्यांचे उपयोग, ओवा, पुदिना अशा मसाल्याचे नेमके उपयोग काय, यापासून ते पाणी बचतीतून सुटलेले गंभीर प्रश्न असे बालसंशोधकांनी साकारलेले नवनवे आविष्कार पाहून पालकांसह शिक्षण विभागातील (Education Department) अधिकारी ही दंग झाले आहेत.
नक्की वाचा : मनोज जरांगेंची एसआयटी चौकशी होणार; नार्वेकरांचे आदेश
विज्ञान प्रदर्शनातून बालसंशोधकांचा हटके अंदाज (Childrens Exibition)
सारसनगर मधील ग्रीन स्पार्क प्री स्कूलमधील समथिंग हटके या सक्सेस अकादमीत आयोजित विज्ञान प्रदर्शनातून बालसंशोधकांचा हा हटके अंदाज पहायला मिळाला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री कार्ले, तसेच अॅड. प्रज्ञा असनीकर यांनी मुलांमधील आत्मविश्वास पाहून कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात वीसहून अधिक प्रयोग सादर केले होते. ओव्याचे महत्त्व काय असते. ग्रीन टी कसा असतो, तुळशीचा उपयोग काय, वर्तमानपत्राचे महत्त्व अशा विविध बाबींवर बालगोपाळांचे हे प्रयोग होते. तीन ते चार वर्षांपासून ते तेरा वर्षांच्या मुलांपर्यंत हे विद्यार्थी होते. प्रयोग सादर करताना वेगळेपण जाणवत होते. प्रत्येक विद्यार्थी आपल्या प्रयोगाचे महत्त्व सांगत होता. त्यांच्यातील आत्मविश्वास वाखाणण्यासारखा होता.
अवश्य वाचा : आशियाई क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
इतक्या लहान वयात मुलांना आलेली समज पाहून श्रीमती कार्ले व असनीकर यांनी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर कार्ले यांनी स्कूलच्या संस्थापक हेमलता पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. इतक्या कमी वयात मुलांवर शाळेत झालेले संस्कार महत्त्वाचे आहेत. अध्यापन करताना पाटील यांनी घेतलेली मेहनत विद्यार्थ्यांच्या आविष्कारातून दिसून आल्याचेही निरीक्षण त्यांनी नोंदवले. योगिनी आणि दुर्वा पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.