नगर : अभिनेत्री चित्रांगदा सिंग (Chitrangada Singh) ही ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये (Battle Of Galwan Movie) सलमान खानसोबत (Salman Khan) मुख्य भूमिकेत (Main Lead) झळकणार असल्याची घोषणा दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी आज अधिकृतपणे जाहीर केले आहे. भारत-चीन सीमावादावर आधारित या वास्तव प्रेरित चित्रपटात सलमान आणि चित्रांगदा पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
नक्की वाचा : भारत-इंग्लंड आज पुन्हा भिडणार;आजपासून तिसऱ्या कसोटीला सुरुवात
दिग्दर्शक लखिया यांच्याकडून चित्रांगदाच्या अभिनयाचे कौतुक (Chitrangada Singh)
गंभीर आणि प्रभावी कथानकांसाठी प्रसिद्ध असलेल्या लखिया यांनी चित्रांगदाच्या अभिनय कौशल्याचे कौतुक करत तिला योग्य निवड असल्याचे सांगितले. मी ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ आणि ‘बॉब बिस्वास’मध्ये तिचे अभिनय पाहून खूप प्रभावित झालो होतो. ती संजीवक अभिनय आणि सुसंवादाचे उत्तम उदाहरण आहे,असं लखिया म्हणाले. “सलमान सरांच्या मूक पण ताकदवान भूमिकेला चित्रांगदाची नाजूक पण ठाम उपस्थिती छान प्रकारे पूरक ठरणार आहे.
अवश्य वाचा : मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरेंचा आत्महत्येचा प्रयत्न, कुलगुरुंवर केला गंभीर आरोप
लखिया अशा अभिनेत्रीच्या शोधात होते जिच्यात ताकद, भावनिकता आणि नाजूकपणा यांचा योग्य संतुलित मिलाफ असेल. हे सर्व गुण चित्रांगदामध्ये सहज दिसले. विशेषतः इंडिया गेटवर घेतलेल्या तिच्या काही छायाचित्रांनी लखिया यांना भारावून टाकले, ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावरील सहज भावभावना आणि सौंदर्य या भूमिकेची खरी प्रतिमा दर्शवत होती.
‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाची निर्मिती लवकरच सुरू होणार (Chitrangada Singh)
बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाची निर्मिती लवकरच सुरू होणार आहे. यंदाच्या वर्षातील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. सलमान खानसारखा सुपरस्टार आणि चित्रांगदा सिंग यांची ताज्या जोडीने चाहत्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण केला आहे.