Chondi : राज्य सरकारच्या पुरवणी मागण्यांमध्ये चौंडी विकास आराखड्यासाठी भरीव आर्थिक तरतूद

Chondi : राज्य सरकारच्या पुरवणी मागण्यांमध्ये चौंडी विकास आराखड्यासाठी भरीव आर्थिक तरतूद

0
Chondi : राज्य सरकारच्या पुरवणी मागण्यांमध्ये चौंडी विकास आराखड्यासाठी भरीव आर्थिक तरतूद
Chondi : राज्य सरकारच्या पुरवणी मागण्यांमध्ये चौंडी विकास आराखड्यासाठी भरीव आर्थिक तरतूद

Chondi : नगर : महाराष्ट्र विधिमंडळाचे (Maharashtra Legislative Assembly) पावसाळी अधिवेशन आजपासून (ता. ३०) सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुरवणी मागण्या सादर केल्या. पुरवणी मागण्यांमध्ये, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्म त्रिशताब्दी निमित्त चौंडी (Chondi) (ता.जामखेड) येथे आयोजित मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या चौंडी विकास आराखड्यासाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Chondi : राज्य सरकारच्या पुरवणी मागण्यांमध्ये चौंडी विकास आराखड्यासाठी भरीव आर्थिक तरतूद
Chondi : राज्य सरकारच्या पुरवणी मागण्यांमध्ये चौंडी विकास आराखड्यासाठी भरीव आर्थिक तरतूद

नक्की वाचा : ‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करायला पाहिजे’;अनिल बोंडेंची टीका

मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी १ कोटीची तरतूद

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी देखील एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक व्हावी, यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. चौंडी येथील मंत्रिमंडळ बैठकीत ६८१ कोटीचा चौंडी विकास आराखडा मंजूर करण्यात आला. त्यापैकी १५४ कोटी निधीच्या कामांना स्थापत्य सल्लागार नेमणूक प्रक्रियेच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली आहे.

अवश्य वाचा : सभापती राम शिंदेंचा रोहित पवारांना सहावा धक्का; जामखेड बाजार समितीच्या उपसभापतींवर अविश्‍वास प्रस्ताव

आज सभागृहात सादर झालेल्या पुरवणी मागण्यांमध्ये (Chondi)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणी मर्यादित चौंडी या संस्थेला शासकीय भागभांडवल म्हणून १३ कोटी २० लाख २५ हजार रुपयांचा समावेश आहे. याच सूतगिरणीला दीर्घ मुदतीचे शासकीय कर्ज म्हणून १७ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीची तरतूद पुरवणी मागणी करण्यात आली आहे. कर्जत-कोरेगाव- चापडगाव- चौंडी- हळगाव- फक्राबाद-कुसडगाव रुंदीकरण व सुधारणा करणे या कामांसाठीचा अंदाजित खर्च २०० कोटी रुपये मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी २०२५-२६ साठी ६१ कोटी ३८ लाख ११ हजार रुपये या पुरवणी मागण्यांमध्ये प्रस्तावित करण्यात आले आहेत. कर्जत येथे दिवाणी न्यायाधीश यांच्या निवासस्थानाकरता एक कोटी २८ लाख ३० हजार रुपयांपैकी या पुरवणी मागणीत २५ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.