Santosh Deshmukh Murder:मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येचा तपास आता सीआयडीकडे!

0
Santosh Deshmukh Murder:मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येचा तपास आता सीआयडीकडे!
Santosh Deshmukh Murder:मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येचा तपास आता सीआयडीकडे!

नगर : बीडमधील सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात या घटनेचे मोठे पडसाद उमटले आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि अनेक लोकप्रतिनिधींनी या हत्येचा तपास सीआयडीकडे वर्ग (CID Investigation) करावा,अशी मागणी केली होती. आता या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अखेर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडे वर्ग झाला आहे. याप्रकरणी केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे निलंबन(Suspended) केले आहे. तर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या निलंबनाचा अहवाल बीडचे पोलीस अधीक्षक यांनी पाठवला आहे.

नक्की वाचा : तामिळनाडूतील खाजगी रुग्णालयाला आग;अल्पवयीन मुलासह सहा जणांचा मृत्यू  

प्रकरण नेमकं काय ? (Santosh Deshmukh Murder)

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं ९ डिसेंबरला दुपारी अज्ञात काही व्यक्तींनी त्यांचं अपहरण केले होते. देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत. त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला गेला. दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी केज पोलीस ठाण्यात गर्दी केली आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली होती. सध्या मस्साजोग परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करावी, तसेच प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली होती.अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे.

अवश्य वाचा : ‘महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा वीज महाग’-जयंत पाटील

पंकजा मुंडेंनी घेतली प्रकरणाची दखल (Santosh Deshmukh Murder)

मस्साजोग येथील सरपंचाचा खून आणि परळीतील तरूण व्यापाऱ्याचे झालेले अपहरण हा प्रकार अतिशय गंभीर असून या दोन्ही घटनांचा तपास विशेष तपास यंत्रणेद्वारे व्हावा,अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली होती. जिल्ह्यात घडणाऱ्या अशा घटनांविषयी पंकजा यांनी चिंता व्यक्त केली असून याविषयी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी आपण स्वतः चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here