संगमनेर : येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील (College of Education) शिक्षक, प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी यांना संगमनेर कारखाना (Sangamner Factory)परिसरातील अमृतेश्वर मंदिराचा परिसर स्वच्छ करत जनजागृती केली आहे. या परिसरातील पाणी, जमीन यावर कचरा (Garbage) होवून प्रदुषण (Pollution) होवू नये व रोगराई पसरू नये या उद्देशाने हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे.
नक्की वाचा : भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या पर्वाला लवकरच सुरवात
दत्तजयंती निमित्त राबवलेल्या या मोहिमेचा उद्देश स्वच्छतेबद्दल जनजागृती करणे आणि ग्रामीण – शहरी घरांमध्ये घरोघरी स्वच्छतेचा संदेशन देवून कच-याची सुरक्षित विल्हेवाट सुनिश्चित करणे हे होता. याप्रसंगी शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राचार्य डाॅ.भालचंद्र भावे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवा विभाग प्रमुख प्राध्यापक राजु शेख, नयना पंजे, मंगल आरोटे,संजय खेमनर, विलास पांढरे व विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
अवश्य वाचा : युवकाकडून बसचालकाला मारहाण
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना परिसरातील महादेव मंदिर परिसरामध्ये अनेक प्रकारचे प्लास्टिकचे तुकडे आणि झाडांचा केर कचरा गोळा करून विद्यार्थ्यांनी एकत्रित केला. स्वच्छता ही मानवी जीवनामध्ये आवश्यक असून स्वच्छतेचा संकल्प प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपले परिसर आणि गाव स्वच्छ राहू शकतात. हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणार्थींनी यात सहभाग घेतला.
जल, जमीन हवा आणि परिसर स्वच्छ असेल तर रोगराई होणार नाही, याकडेही लक्ष वेधले. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेत परिसरातील झाडाझुडपांचा कचरा, कागद, प्लास्टिक जमा करून स्वच्छतेचा संदेश दिला. याप्रसंगी साखर कारखान्याचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी शिक्षणाशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.