Climbing : रतनवाडीत राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर संपन्न

शिबिराच्या समारोपप्रसंगी उपस्थिती (Climbing)

0
Climbing

Climbing : अकोले : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) विद्यार्थी विकास मंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील यूनिटेक सोसायटीचे डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आकुर्डी तसेच डॉ. डी. वाय. पाटील विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने रतनवाडी, कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य (ता. अकोले) येथे महाराष्ट्राच्या (Maharashtra) पारंपरिक संस्कृतीतून आदिवासी सहजीवनाचा अभ्यास व गिर्यारोहण (Climbing) राज्यस्तरीय शिबिर पार पडले.

हे देखील वाचा: २४ तारखेपासून राज्यभर रास्ता रोको; मराठा आंदोलनाची पुढची दिशा

रतनवाडी येथे राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर (Climbing)


या शिबिराचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्ष डॉ. भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, खजिनदार डॉ. रोहिणी पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सन १९९७ पासून कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील रतनवाडी येथे राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिर होत आहे. यंदा या शिबिराचे २७ वे वर्ष होते. या शिबिरात राज्यभरातून २१० विद्यार्थ्यांनी व बारा प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. या शिबिरात सर्व विद्यार्थ्यांना रॅपलिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच रतनगडचे ट्रेकिंग करण्यात आले. याचबरोबर शिबिरार्थींसाठी विविध विषयांवर तज्ज्ञांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना सह्याद्रीतील देवराई या विषयावर डॉ. महेंद्र ख्याडे, सह्याद्रीची भौगोलिक माहिती आणि गिर्यारोहणाचे महत्व या विषयावर प्रा. गणेश फुंदे यांनी मार्गदर्शन केले. तर प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी विविध वनस्पती प्रत्यक्षात दाखवून त्या वनस्पतींबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. या शिबिरात प्राचार्य डॉ. संजय चाकणे, डॉ. काकासाहेब मोहिते, डॉ. पंडित शेळके, डॉ. बी. एन. पवार यांनी सहभागी होऊन रॅपलिंगचे प्रशिक्षण घेतले.

नक्की वाचा : ‘मनोज जरांगे हे रोज खोटं बोलतात, रोज पलटी मारतात’- अजय महाराज बारस्कर 

शिबिराच्या समारोपप्रसंगी उपस्थिती (Climbing)

 
शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, सत्यनिकेतन शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य  टी. एन. कानवडे, रतनवाडीचे माजी सरपंच पांढरे, सरपंच धनश्री झडे उपस्थित होते. शेवटी विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मुकेश तिवारी यांनी मानले. या शिबिराच्या नियोजनात विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मुकेश तिवारी, डॉ. मीनल भोसले, प्रा. आरती पाटील, प्रा. करिश्मा सय्यद, प्रा. खालिद शेख, प्रा. मयूर मुरकुटे,  प्रा. सतीष ठाकर, प्रा. रोहित वरवडकर, प्रा. आकाश शिर्के, प्रा. अभिषेक पोखरकर, प्रा. राहुल थोरात, प्रा. शालिनी यादव यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here