Himachal Cloudburst: हिमाचल प्रदेशातील शिमला,मंडी मध्ये ढगफुटी ;३०जणांचा मृत्यू 

आता वायनाड पाठोपाठ हिमाचल प्रदेशात ढगफुटी झाल्याने हाहाकार माजला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

0
Himachal Cloudburst : हिमाचल प्रदेशातील शिमला,मंडी मध्ये ढगफुटी ;३०जणांचा मृत्यू 
Himachal Cloudburst : हिमाचल प्रदेशातील शिमला,मंडी मध्ये ढगफुटी ;३०जणांचा मृत्यू 

Himachal Cloudburst: सध्या पावसाचे वातावरण असल्याने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या दुर्घटना देखील पाहायला मिळत आहेत. निसर्गाचा कोप कसा असतो हे वायनाडच्या (Wayanad) घटनेनं दाखवून दिलं. आता वायनाड पाठोपाठ हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) ढगफुटी झाल्याने हाहाकार माजला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे (Cloudburst) मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आतापर्यंत ३० जण या घटनेत बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. शिमल्यातील हायड्रो प्रोजेक्टजवळ गुरुवारी पहाटे ढग फुटल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं याला दुजोरा दिला आहे.

नक्की वाचा : पुण्यात पुन्हा पावसाची संततधार; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी (Himachal Cloudburst)

दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये पावसामुळे चांगलचं नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. मान्सूननं देशाच्या मोठ्या भागांत धुमाकूळ घातला आहे. बुधवारी (ता.३१) दिल्लीत विक्रमी पाऊस झाला. आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्याचे पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात सुमारे ३० लोक बेपत्ता झाले आहेत. तर त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या टिहरी गढवाल मध्ये ढगफुटीची घटना घडली आहे.  

हिमाचल प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये ढगफुटीमुळे मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. कुल्लू आणि मंडी जिल्ह्यात ढग फुटण्याच्या घटना घडल्या. या ढगफुटीनंतर अनेकजण बेपत्ता आहेत. वीस पेक्षा अधिक घरे जमीनदोस्त झाली असून अनेक वाहने वाहून गेली आहेत. परिसरातील शाळाही पुरात वाहून गेल्या आहेत. मंडी जिल्ह्यात ढगफुटीनंतर एक मृतदेह सापडला आहे. तर अनेकजण बेपत्ता आहेत. मंडी जिल्हा प्रशासनाने हवाई दलाला बचावासाठी सतर्क केलं असून घटनास्थळी उपस्थित स्थानिक प्रशासन यावेळी मदतकार्यात गुंतलेले आहे.

अवश्य वाचा : सुजय विखे विधानसभा लढवणार?; कुणाला देणार आव्हान 

डीएसआरएफ, पोलीस दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल (Himachal Cloudburst)

उपायुक्त अनुपम कश्यप यांनी सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच डीएसआरएफ, पोलीस दल आणि बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आलं. ते म्हणाले की, ढगफुटीमुळे प्रभावित झालेल्या भागातून  १९ लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी रस्ते बंद झाल्यामुळे बचाव पथक उपकरणांसह दोन किलोमीटर चालत घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. अधिकारी आणि बचाव पथकातील सदस्यांना ढगफुटीमुळे बाधित झालेल्या लोकांना सर्वतोपरी मदत करण्यास सांगण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here