Sunbai Lay Bhaari Film:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सुनबाई लय भारी’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित 

0
Sunbai Lay Bhaari Film:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'सुनबाई लय भारी' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित 
Sunbai Lay Bhaari Film:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'सुनबाई लय भारी' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित 

Sunbai Lay Bhaari Film : दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आता “सुनबाई लय भारी” हा चित्रपट(Sunbai lay Bhaari Movie) घेऊन येणार आहेत. महिला सक्षमीकरण (Women Empowerment)या विषयावर बेतलेल्या धमाल मनोरंजन करणाऱ्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadnvis) यांच्या हस्ते प्रदर्शित (Poster launch) करण्यात आलं आहे. मार्च महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे.

नक्की वाचा :  हार्दिक शुभेच्छा…पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित  
सोनाई फिल्म क्रिएशनतर्फे “सुनबाई लय भारी” या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रपटाच्या पोस्टर लाँच वेळी चित्रपटाचे लेखक, निर्माते गोवर्धन दोलताडे, अभिनेते रोहन पाटील, आमदार तुकाराम बिडकर उपस्थित होते. चित्रपटाचे सहनिर्माते कार्तिक दोलताडे आहेत.

चित्रपटाची कथा नेमकी काय ?(Sunbai Lay Bhaari Film)

महिला सक्षमीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. शिक्षण आणि आरोग्यसेवा यासारख्या काही क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली असली तरी भारतातील महिलांना अजूनही पूर्ण सक्षमीकरणात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सक्षमीकरण म्हणजे महिलांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली साधने देणे इतकेच नाही,तर त्यामध्ये त्यांना मागे ठेवणाऱ्या सामाजिक संरचनांना आव्हान देणे आणि बदलणे देखील समाविष्ट आहे, महिला सबलीकरणासह महिलांवरील अत्याचार थांबवणे, कमी पाठबळ असून सुद्धा कौशल्याच्या जोरावर उत्तुंग भरारी मारणे, सर्वसामान्य महिलांनी उद्योग व्यवसायात भरारी कशी घ्यावी, या आशयसूत्रावर “सुनबाई लय भारी” हा चित्रपट बेतला आहे.  

अवश्य वाचा :  …म्हणून मला टोकाचा निर्णय घ्यावा लागला’;शिवराज राक्षेचं वक्तव्य  



“सुनबाई लय भारी” हा चित्रपट समाजातील अनेक महिलांचे प्रश्न सोडवून त्यांना सामाजिक दृष्टीने वरदान ठरेल. या चित्रपटात मोठ्या कलाकारांचा समावेश असणार आहे .मात्र सध्या कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here