Devendra Fadnavis:’गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही’;संतोष देशमुख प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया  

0
Devendra Fadnavis:'गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही';संतोष देशमुख प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया  
Devendra Fadnavis:'गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही';संतोष देशमुख प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया  

नगर : “संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल,हे मी पहिल्या दिवसांपासून सांगत आलो आहे. कुणालाही अशा प्रकारची हिंसा करण्याचा अधिकार नाही. सर्व दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत, तोपर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील,असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnvis) यांनी केले आहे. संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात आज ज्यांच्यावर विरोधक आरोप करत होते, त्या वाल्मिक कराड (Valmik Karad) यांनी पुणे सीआयडीसमोर शरण आले आहेत. त्यानंतर या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नक्की वाचा : ‘इस्रो’ने रचला इतिहास; स्पॅडेक्स मिशनचे यशस्वी प्रक्षेपण   

‘गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही’ (Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. कुणालाही अशाप्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही. त्या अनुषंगाने आम्ही तपासाला गती दिली असून त्यामुळेच वाल्मिक कराड यांना शरणागती पत्करावी लागली. आता हत्येतील फरार आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके कामी लागले आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही. सर्वांना शोधून काढले जाईल.

आजच स्व.संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी फोनवरून संवाद साधला असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनाही मी आश्वस्त केले आहे. जोपर्यंत आरोपी फासावर लटकत नाही, तोपर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील, हा विश्वास त्यांना दिला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अवश्य वाचा : कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त;वाहतूक मार्गात बदल

‘सीआयडीवर कोणताही दबाव नाही’ (Devendra Fadnavis)

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की,आरोपींवर कोणता गुन्हा दाखल होईल आणि कसा होईल ? याची माहिती पोलीस देतील. जे जे पुरावे आहेत, त्याच्या आधारावर कुणालाही सोडणार नाही, हे मी सांगतो. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीकडे देण्यात आली असून त्यांना पूर्ण स्वायत्ता देण्यात आली आहे. कुणाचाही दबाव त्यांच्यावर राहणार नाही, तसेच कोणताही दबाव चालून घेतला जाणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here