CM Eknath Shinde : राज्य मंत्रिमंडळाची रेकाॅर्डब्रेक बैठक; मुख्य़मंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळाने घेतले ८० धडाकेबाज निर्णय

CM Eknath Shinde : राज्य मंत्रिमंडळाची रेकाॅर्डब्रेक बैठक; मुख्य़मंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळाने घेतले ८० धडाकेबाज निर्णय

0
CM Eknath Shinde : राज्य मंत्रिमंडळाची रेकाॅर्डब्रेक बैठक; मुख्य़मंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळाने घेतले ८० धडाकेबाज निर्णय
CM Eknath Shinde : राज्य मंत्रिमंडळाची रेकाॅर्डब्रेक बैठक; मुख्य़मंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळाने घेतले ८० धडाकेबाज निर्णय

CM Eknath Shinde : नगर : महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)मंत्रिमंडळाने (Cabinet meeting) कामाचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. १०) एकाच दिवशी ८० मोठे निर्णय घेतले आहेत. राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणे, राज्यात तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता, राहाता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी देणे, आदी महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे.

नक्की वाचा: शिर्डी विमानतळाच्या नवीन इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

मंत्रिमंडळ बैठकीत धडाकेबाज निर्णय (CM Eknath Shinde)

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने गुरुवारी एक मोठी रेकाॅर्डब्रेक बैठक घेतली. यात महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा करणे, कायमस्वरुपी विनाअनुदान तत्त्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालयास मान्यता, राज्यात तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता, राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींच्या निवडणुकीस मुदतवाढ, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास अतिरिक्त निधी, महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा, कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधनीला, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात आफ्रिकन सफारी प्रकल्प उभारणे, मराठवाड्यातील शाळांकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत निधीचा तरतूद, राज्यात आंतररष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनीची निर्मिती, नाशिकरोड, तुळजापूर, वणी-यवतमाळ येथे न्यायालय, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यात आला, शबरी महामंडळाच्या थकहमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी करण्यात आली, देवळालीतील भूखंड नाशिक रोडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला मान्यता, मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ, मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गास मान्यता, कात्रज – कोंढवा उड्डाणपुलास बाळासाहेब देवरस यांचे नाव, राहाता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी देण्याचा निर्णय, शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे, पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळे, कराड तालुक्यातील उंडाळे योजनेच्या दुरुस्तीस मान्यता, सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची सुविधा, असे धडाकेबाज निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.