Eknath Shinde:बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधात पोस्टर्स आले कसे?;मुख्यमंत्र्यांचा सवाल

0
Eknath Shinde:बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधात पोस्टर्स आले कसे?;मुख्यमंत्र्यांचा सवाल
Eknath Shinde:बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधात पोस्टर्स आले कसे?;मुख्यमंत्र्यांचा सवाल

eknath shinde : एखादी वाईट घटना घडल्यावर लोक स्वयंस्फूर्तीने आंदोलन करतात हे माहीत आहे.पण बदलापूरच्या (Badalapur)आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या(Ladki Bahin Yojana) विरोधातील पोस्टर्स आलेच कसे ? केवळ लाडकी बहीण योजना बदनाम करण्यासाठीच रेल्वे रोको करण्यात आला, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी केला आहे. कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

नक्की वाचा : ‘आमचा मुलगा निर्दोष आहे’,बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा मोठा दावा

बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधात बॅनर्स आले का ?(Eknath Shinde)

लाडकी बहीण योजना हा आमच्या बहिणींना आधार देण्याचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला बहिणी स्वत: उपस्थित राहत आहेत. ही योजना विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकवणारी असून या योजनेला खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. बदलापुरातील आंदोलनाची पार्श्वभूमी पाहा. एखादं आंदोलन स्वयंस्फूर्तीने होतं. पण बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील बॅनर्स आले. योजनेला बदनाम करण्यासाठी रेल रोको केला. सात आठ तास लोकांना वेठीस धरणं हे कोणतं राजकारण आहे ? असा संतप्त सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

अवश्य वाचा : गुलीगत सुरज चव्हाणची ‘राजाराणी’ चित्रपटात एन्ट्री  

‘विरोधकांची वृत्ती खोटं बोलण्याची’ (Eknath Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की, कोर्टाने एका प्रकरणात आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा झाली असं मी म्हणालो होतो. ते म्हणतात कुठे फाशी झाली? मी पुणे सत्र न्यायालयाचं जजमेंट आताच दाखवलं आहे. विरोधक काहीही बोलत आहे. खोटं बोलायचं ही विरोधकांची वृत्ती आहे. त्यांच्या या वृत्तीला बहिणी त्यांना सडेतोड उत्तर देतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. कोल्हापुरात खंडपीठ करण्याची अनेक वर्षाची मागणी आहे. १५ ऑगस्टच्या कार्यक्रमावेळी मुख्यन्यायाधीशांशी या संदर्भात चर्चा झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here