Eknath Shinde:’लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय राहणार नाही’: एकनाथ शिंदे

0
Eknath Shinde:'लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय राहणार नाही': एकनाथ शिंदे
Eknath Shinde:'लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय राहणार नाही': एकनाथ शिंदे

Eknath Shinde : आठ तासांत मी १० हजार फाईलींवर सह्या करतो, लाडक्या बहिणींना मी लखपती केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. अनिल बाबर (Anil Babar) यांचं नाव न देता टेंभू योजना पूर्ण होऊ शकत नाही असं सांगत टेंभू योजनेला अनिलभाऊ बाबर यांचं नाव देऊ असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं. सांगलीतील शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते.

नक्की वाचा : भाऊबीजेलाही बहिणींना मिळणार ओवाळणी;अजित पवारांचा वादा

‘आमच्या बंडाची ३२ देशांनी दखल घेतली’ (Eknath Shinde)

एकनाथ शिंदे म्हणाले की, अनिल बाबर यांचे नाव घेतल्याशिवाय या सभेला सुरुवात होऊ शकत नाही. अनिल बाबर यांच्याशिवाय टेंभू योजनेचे भूमिपूजन करावे लागेल असे वाटत नव्हते. त्यांचं टेंभू योजनेतील योगदान कुणालाही विसरता येणार नाही. दोन वर्षांपूर्वी सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आणण्याचा आम्ही निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या आणि शिवसेनेच्या हितासाठी आम्ही निर्णय घेतला. एक नाहीतर ५० आमदार माझ्या पाठीमागे उभे राहिले. आमच्या बंडाची ३२ देशांनी दखल घेतली. आमच्या बंडानंतर सरकार देखील स्थापन झालं. अनिलभाऊ बाबर यांच्या निधनानंतर ‘गड आला पण सिंह गेला’ अशी परिस्थिती झाली होती.

अवश्य वाचा : ‘राज्यातील सध्याचे सरकार हे बैलपुत्र,त्यांची बुद्धीही बैलाचीच’-संजय राऊत

योजनांच्या बाबतीत सरकार हात आखडता घेणार नाही(Eknath Shinde)

एकनाथ शिंदे म्हणाले की,लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आम्ही ही योजना आखली नाही. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे हा हेतू आहे. योजनांच्या बाबतीत सरकार हात आखडता घेणार नाही, असं त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, माझ्या हेलिकॉप्टर दौऱ्यावर टीका होते, मी काय कारने प्रवास करू का ? आठ तासात मी दहा हजार फाईलीवर सह्या करतो. लाडकी बहीण, लाडके भाऊ आणि जेष्ठ नागरिक माझ्या पाठीशी आहेत तोवर मला काही चिंता नाही. लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही. सावत्र भावापासून फक्त सावध राहा. लाडकी बहीण योजनेत थोडा जरी खोडा घातला तर कोल्हापुरी जोडा दाखवा. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here