CM Eknath Shinde:एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ!

0
CM Eknath Shinde:एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ!

नगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष जोमाने कामाला लागलेत. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व माघारी घेण्याची प्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे उमेदवाराने अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या नावे असणारी संपत्ती किती आहे हे पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी सोमवारी (ता.२८) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती (Property) समोर आली. त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या केदार दिघे (Kedar Dighe) यांच्यापेक्षा एकनाथ शिंदेंची संपत्ती तब्बल १६ कोटींनी जास्त आहे.

नक्की वाचा : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर

एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत तिप्पट वाढ  (CM Eknath Shinde)

एकनाथ शिंदेंनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या संपत्तीत २०१९ च्या तुलनेत तब्बल तिप्पट वाढ झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी एकनाथ शिंदेंनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती १३ कोटी ६६ लाख ७४ हजार ९३२ इतकी होती. सोमवारी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा आकडा थेट ३७ कोटी ६८ लाख ५८ हजार १५० इतका वाढला आहे. म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या नावे असणाऱ्या ३७ कोटींहून अधिकच्या संपत्तीमध्ये ९ कोटी २१ लाख ७८ हजार १५० रुपयांची जंगम मालमत्ता तर २८ कोटी ४६ लाख ८० हजार रूपये मूल्य असणारी स्थावर मालमत्ता आहे. याच प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदेंवर ९ गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याशिवाय, त्यांचं शिक्षण एमए झाल्याचंही नमूद करण्यात आलंय.

अवश्य वाचा : मोठी बातमी! काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आनंद दिघेंचे पुतणे रिंगणात  (CM Eknath Shinde)

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली. यानिमित्ताने महाराष्ट्रात आणखी एक काका-पुतणे आमने-सामने उभे ठाकल्याचं दिसून येत आहे. केदार दिघेंनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या नावे एकूण संपत्ती १ कोटी २० लाख ५६ हजार २५५ रुपये आहे. त्यात ६५ लाख ५६ हजार २५५ रुपये मूल्याचं जंगम मालमत्ता आहे. केदार दिखे  हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून त्यांच्यावर २ गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here