CM Medical Relief Fund : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (Financially Weak) रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी (CM Medical Relief Fund) आशेचा नवा किरण ठरला आहे. गेल्या सहा महिन्यांत या निधीच्या माध्यमातून जवळपास ४ कोटी ८९ लाख ९३ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य रुग्णांना देण्यात आले असून उपचारासाठी पुरेसा आर्थिक आधार नसलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगरच्या कृष्णराज टेमकर याची महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड
जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जांची तातडीने पडताळणी
अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात १ मे २०२५ रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कक्षात दाखल अर्जांची तातडीने पडताळणी करून ते मुंबईकडे पाठवले जातात. कक्षाचे काम डॉ. निळकंठ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य स्वप्निल कच्छवे व वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक अजय काळे यांच्या देखरेखीखाली सुरु आहे.
अवश्य वाचा : स्मशानभूमीत लाईटची सोय नसल्याने मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात केले अंत्यसंस्कार
गंभीर आजारांवरील उपचारासाठी मदत (CM Medical Relief Fund)
या निधीतून कर्करोग, हृदयविकार, मेंदूविकार, नवजात बालकांचे गंभीर आजार, मूत्रपिंड व लिव्हर प्रत्यारोपण, अपघातातील शस्त्रक्रिया, महागड्या ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया अशा गंभीर व जीवघेण्या आजारांवरील उपचारासाठी मदत दिली जाते. याशिवाय, मदत न मिळाल्यास महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यासारख्या पर्यायी योजनांची माहितीही रुग्णांना देण्यात येते. कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर, निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी कार्यरत असून नागरिकांनी थेट येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. ठाकरे यांनी केले आहे.
मागील सहा महिन्यात रुग्णांना देण्यात आलेली मदत
जानेवारी – ३२ अर्जांना २४ लाख ६५ हजार रुपये
फेब्रुवारी – २८ अर्जांना २२ लाख ७५ हजार रुपये
मार्च – ४३ अर्जांना ३२ लाख २५ हजार रुपये
एप्रिल – २९ अर्जांना २४ लाख ७० हजार रुपये
मे – ३२ अर्जांना २४ लाख ६५ हजार रुपये
जून – ३२० अर्जांना २ कोटी ७३ लाख ६३ हजार रुपये
१३ जुलैपर्यंत – १०३ अर्जांना ८७ लाख ३० हजार रुपये