Code of Conduct : भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी संबंध काय?; ‘शिवप्रतिष्ठान’च्या धारकऱ्यांचा सवाल 

Code of Conduct : भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी संबंध काय?; 'शिवप्रतिष्ठान'च्या धारकऱ्यांचा सवाल 

0
saffron flag

Code of Conduct : नगर : भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी (Code of Conduct) संबंध काय? असा सवाल, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे (Shivpratishthan Hindustan) जिल्हा प्रमुख बापू ठाणगे यांनी केला असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. नगर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये भगवे ध्वज (saffron flag) काढण्याचे काम पोलीस (Police) प्रशासन व निवडणूक (Election) शाखेकडून सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त करत हे निवेदन देण्यात आले.

हे देखील वाचा : कर्जत एमआयडीसीचा प्रश्न पुन्हा न्यायालयात

भगवा ध्वज हिंदू धर्माचे प्रतीक (Code of Conduct)

आम्ही सर्व भारतीय नागरिक भारतीय संविधानाचा आदर व कर्तव्य निष्ठेने पालन करतो. यावर्षी लोकसभा निवडणूका मे महिन्यात होणार असल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. पोलीस प्रशासन आणि शासकीय व्यवस्था खासगी मालकीच्या जागांमधील व मंदिर परिसरातील भगवे झेंडे काढण्याचा आग्रह धरू लागली आहे. भगवा ध्वज हिंदू धर्माचे प्रतीक आहे. तो कोणत्याही राजकीय पक्षांशी बांधिल नाही. भारतीय संविधानानुसार धार्मिक आचरण करण्याचे अधिकार संविधानानेच भारतीयांना दिलेले आहेत. त्यात पूजापाठ, आरती, ध्वजपूजन या धार्मिक विधींचा समावेश आहे.

Code of Conduct

नक्की वाचा : सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्यांवर होणार कारवाई

हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावनेची काळजी घेण्याचे आवाहन (Code of Conduct )

आचारसंहिता लागू करताना हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्याचे आदेश प्रशासनाला द्यावेत. भगव्या ध्वजावर पक्षाचे चिन्ह किंवा पक्षाचे नाव असल्यास ते काढण्याच्या सूचना द्याव्यात. पक्ष चिन्हानुसार आचारसंहितेचा विचार केला, तर काँग्रेस पक्षाचे चिन्ह माणसाच्या हाताचा पंजा आहे. भारतीय जनता पक्षाचे चिन्ह कमळ आहे. आचारसंहिता लागू झाल्यावर सर्वांना हात बांधायला सांगितले जात नाहीत. सर्व कमळाची फुले तोडली जात नाहीत. तारतम्याने विचार करून हाताचा पंजा आणि कमळ या चिन्हांबाबत लवचिकता दाखवली जाते. असाच विचार भगव्या ध्वजाबाबत करणे गरजेचे आहे.

त्यामुळे आचारसंहितेमधून भगवा ध्वज वगळण्याच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा. प्रशासन आणि निवडणूक संस्थेस तशा सूचना द्याव्यात, असे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख बापू ठाणगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर बापू ठाणगे यांच्यासह दिगंबर गेंट्याल, भरत शिंदे, रूपेश वाळके, अनिकेत शिंदे, दयाल पाटील, मनोज धोत्रे, विशाल भागवत या धर्मप्रेमी धारकरी युवकांच्याही सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here