Code Of Conduct : आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी : निवडणूक निर्णय अधिकारी

Code Of Conduct

0
Code Of Conduct

Code Of Conduct : अहिल्यानगर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Assembly Elections) आदर्श आचारसंहिता (Code Of Conduct) लागू झाली असून आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकाने सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या (Kopargaon Assembly Constituency) निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांनी दिले.

नक्की वाचा: शरद पवारांची सुरक्षा वाढणार, झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह

आचारसंहिता भरारी पथकांचा आढावा

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आचारसंहिता भरारी पथकांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते व‌ आचारसंहिता कक्षाचे अधिकारी उपस्थित होते.

अवश्य वाचा: दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल, विषयांची संख्या वाढणार

श्रीमती सोळंके म्हणाल्या, (Code Of Conduct)

एफएसटी (भरारी) पथकाने सी-व्हीजील ॲप मोबाईलवर कार्यरत करून घ्यावे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारीचे शंभर मिनीटांच्या आत निवारण करावे. एफएसटीच्या ६ पथके कार्यरत झाली आहेत. स्थिर सर्वेक्षण पथकांसाठी ३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यासाठी दिवसा ३ व रात्री ३ पथके चेक पोस्टसाठी कार्यान्वीत असतील. व्हिडिओ सर्वेक्षण पथकांनी सर्व राजकीय सभांचे काटेकोरपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे. खर्च पथकानेही सूक्ष्म तपासणी करण्यात येणार आहे.

निवडणूककामी कोणत्याही पथक प्रमुखांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये अथवा रजेवर जावू नये असे निर्देशही श्रीमती सोळंके यांनी दिले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे वाचन करून त्यानुसारच त्याची अंमलबजावणी करावी. कार्यालय व परिसरातील विकास कामांचे भूमिपूजन फलक, कोनशीला, राजकीय व्यक्तींची छायाचित्रे व पक्षाची चिन्हे असलेले बॅनर, होर्डिंग्ज तात्काळ काढण्यात यावे. रस्ते व सार्वजनिक जागेवर प्रचार साहित्य लागणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.