Code of Conduct : आदर्श आचारसंहिता लागू होण्याच्या ४८ तासात जिल्ह्यातील २४ हजार ९६९ जाहिराती काढल्या

Code of Conduct : आदर्श आचारसंहिता लागू होण्याच्या ४८ तासात जिल्ह्यातील २४ हजार ९६९ जाहिराती काढल्या

0
Code of Conduct : आदर्श आचारसंहिता लागू होण्याच्या ४८ तासात जिल्ह्यातील २४ हजार ९६९ जाहिराती काढल्या
Code of Conduct : आदर्श आचारसंहिता लागू होण्याच्या ४८ तासात जिल्ह्यातील २४ हजार ९६९ जाहिराती काढल्या

Code of Conduct : अहिल्यानगर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Assembly Elections) अनुषंगाने आदर्श आचारसंहिता (Code of Conduct) लागू झाल्यापासूनच्या ४८ तासामध्ये जिल्ह्यातील शासकीय कार्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच खाजगी मालमत्तेवरील भित्तीपत्रके, घोषणा फलक, रंगविलेल्या जाहिराती, कोनशिला, झेंडे काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यातील शासकीय (Govt) कार्यालय परिसरातील ११ हजार ६४१, सार्वजनिक ठिकाणच्या ९ हजार ५०२ तर खाजगी मालमत्तेवरील ३ हजार ८२६ अशा एकूण २४ हजार ९६९ जाहिराती काढण्यात आल्या असल्याची माहिती आचारसंहिता कक्षातर्फे देण्यात आली आहे.

नक्की वाचा: शरद पवारांची सुरक्षा वाढणार, झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह

शासकीय कार्यालय परिसरातील जाहिराती हटविल्या

अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये शासकीय कार्यालय परिसर १ हजार ८६४, सार्वजनिक ठिकाण ३९१ तर खाजगी मालमत्तेवरील ३२० एवढ्या जाहिराती हटविण्यात आल्या.

अवश्य वाचा: दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल, विषयांची संख्या वाढणार

खाजगी मालमत्तेवरील जाहिराती हटविल्या (Code of Conduct)

संगमनेर मतदारसंघ कार्यालय परिसर ८१६, सार्वजनिक ठिकाण १ हजार ८८, खाजगी मालमत्तेवरील २५५, शिर्डी मतदारसंघ कार्यालय परिसर ९१६, सार्वजनिक ठिकाण १ हजार ६४१, खाजगी मालमत्तेवरील ३५१, कोपरगाव मतदारसंघ कार्यालय परिसर ९५४, सार्वजनिक ठिकाण ६१९, खाजगी मालमत्तेवरील ३०९, श्रीरामपूर मतदारसंघ कार्यालय परिसर १ हजार १३१, सार्वजनिक ठिकाण १ हजार ५५० एवढ्या जाहिराती हटविण्यात आल्या.

नेवासा मतदारसंघ कार्यालय परिसर ३२४, सार्वजनिक ठिकाण ५७७, शेवगाव मतदारसंघ कार्यालय परिसर ८५४, सार्वजनिक ठिकाण ९३७, खाजगी मालमत्तेवरील १ हजार ७२३, राहुरी मतदारसंघ कार्यालय परिसर २५४, सार्वजनिक ठिकाण १४१, खाजगी मालमत्तेवरील २१, पारनेर मतदारसंघ कार्यालय परिसर १ हजार १२३, सार्वजनिक ठिकाण ९७८, खाजगी मालमत्तेवरील ४९५ जाहिराती काढण्यात आल्या.

अहमदनगर शहर मतदारसंघ कार्यालय परिसर २८६, सार्वजनिक ठिकाण ४१६, खाजगी मालमत्तेवरील ४१, श्रीगोंदा मतदारसंघ कार्यालय परिसर १ हजार २९४, सार्वजनिक ठिकाण ८०२, खाजगी मालमत्तेवरील ३११ तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये शासकीय कार्यालय परिसर १ हजार ८२५, सार्वजनिक ठिकाणच्या ३६२ जाहिराती काढण्यात आल्या असल्याचे आचारसंहिता कक्षातर्फे कळविण्यात आले आहे.