Code of Conduct : नगर : निवडणूक आयोगाने (Election Commission) विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाची (Code of Conduct) तक्रार दाखल करण्यासाठी सी-व्हिजिल ॲप (cVIGIL – Apps), दूरध्वनी आणि प्रत्यक्ष तक्रार (Complaint) करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. आतापर्यंत १२४ तक्रारी आल्या आहेत. सी-व्हिजिलवर सर्वाधिक ९९ तक्रारी आल्या असून आचार संहिता कक्षाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर सरासरी ३४ मिनिटांमध्ये कार्यवाही होते. ॲपवर आतापर्यंत ९९ तक्रारी प्राप्त झाल्या असून, सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. ऑफलाइन आलेल्या २५ पैकी २३ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत, तर उर्वरित दोन तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे.
नक्की वाचा: दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधी गुन्हे
सी-व्हिजिल ॲपवर तक्रारी करण्यास प्राधान्य
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली. आचारसंहितेची घोषणा झाल्यापासून सी-व्हिजिल ॲपवर तक्रारी येत आहेत. दूरध्वनी आणि प्रत्यक्ष तक्रारी करण्याची सुविधा आहे. परंतु, मोबाईलच्या माध्यमातून सी-व्हिजिल ॲपवर तक्रारी करण्यास जागरूक नागरिक प्राधान्य देत आहेत. फ्लेक्स, चारचाकी वाहनांच्या मागील काचेवर उमेदवाराचे फोटो, विना परवानगी प्रचार सुरू असणे असे तक्रारीचे स्वरूप आहे. सी-व्हिजिलवर आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या ९९ तक्रारी, तर ऑफलाइन २५ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
अवश्य वाचा: संजय राऊतांची राहुल जगतापांवर जोरदार टीका; पाचपुतेंचाही घेतला समाचार
शंभर मिनिटांमध्ये तक्रारीवर कार्यवाही करणे अपेक्षित (Code of Conduct)
सी-व्हिजिलवर ॲपमध्ये फोटो, व्हिडिओ किंवा ऑडिओ तयार करून अपलोड केल्यानंतर तक्रारीची नोंद होते. तक्रार नोंदविल्यानंतर जिल्हा आचारसंहिता नियंत्रण कक्षाला ही माहिती उपलब्ध होते. तक्रार असलेल्या संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ही तक्रार कार्यवाहीसाठी पाठविली जाते. पाच मिनिटांमध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठविली जाते. शंभर मिनिटांमध्ये तक्रारीवर कार्यवाही करणे अपेक्षित असते. याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवावा लागतो. ॲपवर आतापर्यंत ९९ तक्रारी प्राप्त झाल्या असून, सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. ऑफलाइन आलेल्या २५ पैकी २३ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत, तर उर्वरित दोन तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे.