Code of Conduct : प्रचार साहित्याचीही परवानगी घ्यावी; आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार

Code of Conduct : प्रचार साहित्याचीही परवानगी घ्यावी; आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार

0
Code of Conduct : प्रचार साहित्याचीही परवानगी घ्यावी; आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार
Code of Conduct : प्रचार साहित्याचीही परवानगी घ्यावी; आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार

Code of Conduct : नगर : अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा (Ahilyanagar Municipal Corporation Election) कार्यक्रम सुरू झाला आहे. आदर्श आचारसंहितेची (Code of Conduct) अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) आदेशानुसार आचारसंहिता काळात प्रचार सभा, प्रचाराची रॅली यासाठी किमान ४८ तास अगोदर परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच, प्रचारासाठी वापरले जाणारे साहित्य (Campaign Material), सोशल मीडियावर प्रचारासाठी वापरला जाणारा मजकूर आदींचीही पूर्वपरवानगी आवश्यक आहे. उमेदवारासह सूचक व अनुमोदकाचेही ना देय प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. सर्वांनी आचारसंहितेचे पालन करावे, उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत डांगे यांनी दिला आहे.

अवश्य वाचा : अहिल्यानगरच्या ‘एसबीआय’च्या मुख्य शाखेत ३ कोटी ७७ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल

उपस्थितांना निवडणूक प्रक्रियेची दिली माहिती

निवडणूक कार्यक्रम, आचारसंहिता, निवडणूक अधिकारी, प्रशासनाकडून उपलब्ध सुविधा, उमेदवारी अर्ज, विविध प्रकारच्या परवानग्या व याबाबत राज्य निवडणूक आयोगाने दिलेले निर्देश आदींची माहिती देण्यासाठी शहरातील राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक महापालिकेत आयोजित करण्यात आली होती. आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह सर्व निवडणूक अधिकारी, आचारसंहिता कक्षाच्या प्रमुखांनी उपस्थितांना निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली.

नक्की वाचा : अहिल्यानगर शहरात बंधू-भावाचे वातावरण दिसत नाही : माजी मंत्री थोरात

आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, (Code of Conduct)

निवडणुकीचा जाहीर प्रचार १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत करता येणार आहे. मतमोजणी राज्य वखार महामंडळाच्या एमआयडीसी येथील गोडावून क्रमांक ६ व ७ येथे होणार आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म ३० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत दाखल करावे लागतील. निवडणुक खर्चाचा तपशील रोजच्या रोज देणे बंधनकारक आहे. नामनिर्देशन पत्रासोबत सर्व सुचना देण्यात आलेल्या आहेत. उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र, ना देय प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. नॉन क्रिमीलियरची आवश्यकता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उपजिल्हाधिकारी सायली सोळंके म्हणाल्या, (Code of Conduct)

प्रचारसाठीचे वाहन वापर, सभा, रॅली, पोष्टर छपाई, बॅनर, प्रचार कार्यालय आदींना परवानगी घ्यावी लागेल. मजकूर प्रमाणीकरण करून घ्यावा. सोशल मिडीया, व्हॉटसअप वरील प्रसिध्द करण्यात येणा-या मजकूर/माहिती प्रसिध्द करण्यापूर्वी समितीकडून प्रमाणीकरण करून घेण्यात यावे. यासाठी झालेल्या खर्चाचा निवडणूक खर्चात समावेश होईल. परवानगी न घेता व आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास संबधीताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येईल. राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली.

पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे म्हणाले, (Code of Conduct)

जातीय व धार्मिक समीकरण बिघडणार नाही याची खबरदारी घ्यावी. जात, धर्म भावना दुखावल्या गेल्याचे निदर्शनास आल्यास संबधीताविरुध्द गुन्हा दाखल होईल. ज्यांच्याविरूध्द मागील निवडणूक कालावधीत गुन्ह दाखल असतील त्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, मागील २० वर्षात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.