Cold : नगर : जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत कडाक्याची थंडी (Cold) पडत असून जिल्ह्याचे किमान तापमान (Temperature) १० सेल्सिअस पेक्षा कमी झाल्याचे हवामान खात्याच्या नोंदीनुसार दिसून आले आहे. ४ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी तीव्र थंडीच्या लाटेची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ”येलो अलर्ट” (Yellow Alert) प्रसारीत करण्यात आला आहे. नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी दक्षता घेण्याचे आवाहन, जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी तसे आदेश पारित केले आहेत.
अवश्य वाचा: धनंजय मुंडे यांची हत्या झाली असती पण ते वाचले; रासप आमदाराच्या दाव्याने खळबळ
नागरिकांनी अशी घ्यावी काळजी
हिवाळ्यामध्ये स्वेटर, मफलर, कानटोपी, हात व पायमोजे तसेच रग, चादर यासारखे इतर पुरेसे उबदार कपडे वापरावेत. थंडीची लाट आली असताना शक्यतो घरातच थांबावे, थंड वाऱ्यापासून बचावासाठी शक्यतो प्रवास टाळावा. स्वतःला कोरडे ठेवावे. शरीर ओले असल्यास त्वरीत कपडे बदलावे, ज्याद्वारे शरीरातील उष्णता कमी होणार नाही. शरीराचे तापमान समतोल राखण्यासाठी निरोगी अन्न खावे. पुरेशी प्रतिकारशक्ती राखण्यासाठी व्हिटॅमिन – सी समृध्द फळे आणि भाज्या खाव्यात. नियमितपणे गरम द्रव्य प्यावे, कारण यामुळे थंडी दरम्यान शरीरातील उष्णता कायम राहील.
नक्की वाचा : रोहित पवारांना त्यांचा पराभव दिसू लागलाय; राम शिंदेंनी साधला निशाणा
जनावरांचे थंडीपासून संरक्षण होण्याबाबत दक्षता घ्यावी (Cold)
नागरिकांनी हिवाळ्याच्या कालावधीत स्वतःसह जनावरांचे थंडीपासून संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. स्थानिक प्रशासनाद्वारे वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे आरोग्य केंद्र, रूग्णालय वा १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.



