Weather Update:राज्यात थंडीचा जोर वाढणार,हवामान विभागाचा अंदाज काय?

0
Weather Update:राज्यात थंडीचा जोर वाढणार,हवामान विभागाचा अंदाज काय?
Weather Update:राज्यात थंडीचा जोर वाढणार,हवामान विभागाचा अंदाज काय?

Weather Update : राज्यात पावसाळा संपल्यानंतर नागरिकांना आता गारठा जाणवू लागलाय.त्यातच उत्तर महाराष्ट्राला चांगलीच हुडहुडी भरली आहे. येत्या आठवड्यापासून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका वाढला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही (Marathvada) गारठा वाढू लागल्यानं स्वेटर, कानटोप्या आता बाहेर काढल्या जाऊ लागल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार,महाराष्ट्रात थंडीचा जोर (Cold) आणखी वाढणार असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान १० अंशांखाली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नक्की वाचा : दहावीच्या परीक्षेत गणित,विज्ञानात उत्तीर्ण होण्यासाठी ‘इतके’ गुण आवश्यक  

नोव्हेंबरच्या शेवटी तापमान घसरणार (Weather Update)

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार,राज्यात यंदा कडाक्याची थंडी राहणार असून नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील तापमान कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात किमान तापमान १० अंशांखाली जाण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडून वारे वाहण्याची शक्यता असल्याने थंडीचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

अवश्य वाचा : ‘नवीन सरकार आल्यास मनोज जरांगेंवर उपोषणाची वेळ येणार नाही’- चंद्रकांत पाटील

हवामानाचा अंदाज काय सांगतो ?  (Weather Update)

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार,महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस तापमानात फारसा फरक दिसणार नाही. येत्या २४ तासानंतर २ ते ३ अंशाने तापमान घसरण्याची शक्यता आहे. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवसात हळूहळू तापमान घटणार असल्याचं मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितलं आहे. दरम्यान संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here