Cold Weather:दिवाळीत हुडहुडी,राज्यात ‘या’ तारखेला थंडीची लाट पसरणार

0
Cold Weather:दिवाळीत हुडहुडी,राज्यात 'या' तारखेला थंडीची लाट पसरणार
Cold Weather:दिवाळीत हुडहुडी,राज्यात 'या' तारखेला थंडीची लाट पसरणार

Cold Weather : राज्यात काही ठिकाणी कडाक्याचे ऊन आणि रात्री मुसळधार पाऊस (Rain) पडत आहे. एकीकडे ऑक्टोबर हिट आहे. तर दुसरीकडे राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दिवाळी सण जवळ आला तरी देखील राज्यात पाऊस सुरूच आहे. अशामध्ये राज्यात थंडी (Cold) कधी पडणार याबाबत हवामान खात्याने (IMD) महत्वाची माहिती दिली आहे.

नक्की वाचा : ‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी;अजित पवार गटाला कोणते चिन्ह मिळणार?

१ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट (Cold Weather)

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रात थंडीची लाट पसरणार आहे. म्हणजेच दिवाळीपासून राज्यात थंडी सुरू होणार आहे. ऑक्टोबर अखेरला मान्सूनची सांगता होणार आहे. येत्या आठवडाभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि अकोला या भागात थंडीला सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी हा अंदाज वर्तवलाय.

अवश्य वाचा : मोठी बातमी!शंकरराव गडाख यांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याची नोटीस

नगरसह १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण (Cold Weather)


गुरुवारपासून राज्यात पावसाची उघडीप मिळू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. २६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान फक्त दक्षिण महाराष्ट्रात ४ दिवस किरकोळ पावसाची शक्यता आहे. या ४ दिवसांत दक्षिण नगर , पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या १८ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here