
Collector : नगर : धुळे येथे नुकत्याच झालेल्या विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावत चांगली कामगिरी केली. पुढील वर्षी क्रीडा स्पर्धा (Sports Competition) आयोजनाची संधी आपल्या जिल्ह्याला मिळाली असून या स्पर्धांमध्ये जिल्ह्याने चांगली कामगिरी करावी, यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या (Collector) अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. समितीने उत्कृष्ट खेळाडूंची (Players) निवड करत त्यांना प्रोत्साहन द्यावे. खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा, साहित्याची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाहीही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath) यांनी दिली. तसेच खेळाच्या माध्यमातून सांघिक भावना वाढीस लागून प्रशासनात एक सक्षम व कार्यक्षम टीम निर्माण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अवश्य वाचा : परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घालणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल
चांगली कामगिरी केल्याबद्दल गुण गौरव (Collector)
महसुल विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याबद्दल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गुण गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, श्रीकांत चिंचकर, सायली सोळंके, गौरी सावंत, शाहूराज मोरे, अरुण उंडे आदी उपस्थित होते.