Collector : आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Collector : आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

0
Collector

Collector : नगर : लाेकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयाेगाने (Central Election Commission) आदर्शआचार संहिता लागू केलेली आहे. पुढे ६ जुन २०२४ पर्यंत आदर्श आचारसंहिता लागू असणार आहे. तरी निवडणुकी संबंधित सर्व यंत्रणेने आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. 

हे देखील वाचा : डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्रात टीव्हीवर चार मनोरुग्ण दिसतात

आचारसंहिता अंमलबजावणी पूर्वतयारीबाबत बैठक (Collector)

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नेहरू सभागृहात बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे  अपर मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास मापारी , शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य अधिकारी संभाजी लांगोरे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

नक्की वाचा : नगरमध्ये पुन्हा माणुसकीला काळिमा फासणारी घटना; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेची आत्महत्या

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले (Collector)

”शासकीय मालकीची कार्यालये, शासकीय वास्तू व त्यांच्या भिंतीवरील जाहिराती, भित्तीपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स, कटआऊट, होर्डिंग्ज, झेंडे इत्यादी तत्काळ काढावीत. तर सार्वजनिक जागेवरील सर्व राजकीय जाहिराती, भित्तीपत्रके, पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे, होर्डिग्ज, कटआऊट इत्यादी तत्काळ काढून घेणे आवश्यक आहे. तसेच बसस्थानक, बसथांबा, रेल्वे पूल, एसटी महामंडळाच्या बसेस व विद्युत व टेलिफोन खांब, यावरील जाहिराती काढून घेणे बंधनकारक आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने तातडीने कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले. मालमत्ता विद्रुपण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा-१९९५ मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. शासकीय संकेतस्थळावरील, राजकीय व्यक्तींचे छायाचित्र तसेच नावे वगळण्याची कारवाई करावी तसेच बांधकाम व विकासासंदर्भातील माहिती संबंधित विभागाने तत्काळ जिल्हा निवडणूक शाखेकडे कळवावी अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

            आचारसंहिता काळात सर्व  यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे, तसेच निवडणुकीतील कामांची सर्व माहिती ठेवावी. लोकसभा निवडणुकीच्या कर्तव्यात कुढल्याही चुका होता कामा नये, असे स्पष्ट सांगत संभाव्य टंचाई परिस्थतीमध्ये टंचाई निवारणाची कामे फक्त शासकीय यंत्रणेमार्फत होणे अपेक्षित आहे. आचारसंहिता काळात चुकीची माहिती पसरविण्यात आली, तर त्याबाबत सत्यता तत्काळ तपासून त्याचा अहवाल सादर करावा. मतदार याद्यांमध्ये काही त्रृटी राहिल्यास त्या तत्काळ दूर कराव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आचारसंहिता काळात जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी तत्पर राहून काम करावे, असे सांगितले. यावेळी आदर्श आचारसंहिता व तिची अंमलबजावणी, संदर्भातील सर्व बाबींच्या माहितीचे  सादरीकरण, उपजिल्हाधिकारी शाहू मोरे यांनी केले. अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी सी-व्हीजीलॲप व ॲप्लीकेशनबाबत माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here