Collector : जिल्ह्यात किमान ७५ टक्क्यांच्या पुढे मतदान घडवावे : जिल्हाधिकारी

Collector : जिल्ह्यात किमान ७५ टक्क्यांच्या पुढे मतदान घडवावे : जिल्हाधिकारी

0
Collector
Collector : जिल्ह्यात किमान ७५ टक्क्यांच्या पुढे मतदान घडवावे : जिल्हाधिकारी

Collector : राहाता : भारत (India) देशाचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरु असल्याने अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदार संघातील मतदारांनी आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावून किमान ७५ टक्क्यांच्या पुढे जिल्ह्यात मतदान घडवावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक (Election) निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी (Collector) सिध्दाराम सालिमट यांनी केले.

Collector
Collector

हे देखील वाचा: अजय महाराज बारस्कर यांचे मनोज जरांगेंवर गंभीर आरोप

अधिकाऱ्यांची उपस्थिती (Collector)

राहाता येथील शिर्डी ३८ लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक कार्यालयात निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सालिमट यांनी हे आवाहन केले. याप्रसंगी शिर्डी ३८ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपसहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा राहात्याचे तहसीलदार अमोल मोरे आदी यावेळी उपस्थित होते.

नक्की वाचा : अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषक हरला; उद्धव ठाकरे यांचा पलटवार

शिर्डी मतदार संघाची माहिती (Collector)

शिर्डी ३८ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी संपुर्ण मतदार संघाच्या निवडणूक यंत्रणेची माहिती दिली. ते म्हणाले, या मतदार संघात एकूण १६ लाख ७० हजार १४५ मतदार आहेत. त्यात ८ लाख ६० हजार ९१४ मतदार पुरुष तर ८ लाख ९ हजार १५३ मतदार महिला आहेत. तर ७८ तृतीयपंथी मतदार आहेत. त्यात अपंग ९३४२ मतदार आहेत. वयाची ८० वर्ष ओलांडलेले २५ हजार ५४३ मतदार आहेत. १०० च्या वर वय असलेले 700 मतदार आहेत. शिर्डी लोकसभा मतदार संघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा या मतदार विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. या प्रत्येक मतदार संघात दोन दोन आदर्श मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येकी एक महिला अधिकारी कर्मचारी संचालित मतदार केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकी एक अपंग कर्मचारी संचालित मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. तर युवा कर्मचारी संचालित एक एक मतदार केंद्र उभारण्यात येणार आहे. या सहाही विधानसभा मतदार संघात शहरी २८७ मतदान केंद्र, ग्रामीण मध्ये १४२१ मतदान केंद्र, एकूण १७०८ मतदान केंद्र आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here