Collector : नगर : नगर जिल्ह्यातील (Nagar District) अर्थचक्राला अधिक गती मिळून रोजगार (Employment) निर्मितीमध्ये वृद्धी होण्याच्यादृष्टीने जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
नक्की वाचा: ‘आमचा मुलगा निर्दोष आहे’,बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा मोठा दावा
कृषी विभागाची आढावा बैठकीचे आयोजन
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृषी विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ (Siddharam Salimath) बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, (Collector)
अवश्य वाचा: ‘बदलापूरच्या घटनेत राजकारण आहे म्हणणारेही विकृत’; उद्धव ठाकरेंचा संताप
आपला जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा आहे. जिल्ह्यात दुग्धोत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. दूध व दुग्धजन्य उत्पादन, फळे व भाजीपाला उत्पादन क्षेत्रात अधिकाधिक क्लस्टर निर्माण करावेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा जिल्ह्यातील एकल महिलांना लाभ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. महिला आर्थिक विकास महामंडळ व कृषी विभागाने पुढाकार घेत बचत गटातील महिला, एकल महिला यांचे क्लस्टर तयार करण्यात यावे. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमध्ये गतवर्षात जिल्ह्याने उत्कृष्ट काम करत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. यावर्षी सुद्धा या योजनेमध्ये अधिक गतीने काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
कमी पाण्यामध्ये शाश्वत उत्पन्न देणारा उद्योग म्हणून रेशीम उद्योगाकडे पाहिले जाते. जिल्ह्यात रेशीमचे क्षेत्र वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याबरोबरच जिल्ह्यात रेशीमवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणीसाठी अधिक प्रयत्न करण्याच्या सूचना सालीमठ यांनी दिल्या.