Collector : जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची अकोले स्ट्राँग रुमला भेट

0
Collector

Collector : अकोले : अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अकोले येथील शासकीय धान्य गोदाम (जुने) येथे स्थापन केलेल्या स्ट्रॉगरूमला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

नक्की वाचा: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर

जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली

यावेळी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था, ईव्हीएम यंत्राचे वाटप व मत मोजणीच्या दिवशी जागेचे नियोजन याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतली. प्रशासनाच्या सर्व विभागांच्या निवडणूकविषयक तयारीचा आढावा व कामकाजाची पाहणी करून निवडणूक आचारसंहितेच्यादृष्टीने त्यांनी सूचना दिल्या. निवडणूक आयोगाच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

अवश्य वाचा: माझ्यावर हल्‍ला करण्‍याचा कट : सुजय विखे पाटील

स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पाहणी

पोलिस अधीक्षक ओला यांनी ईव्हीएम सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पाहणी केली. यावेळी अकोले विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे, पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, गटविकास अधिकारी विकास चौरे, नगरपंचायत मुख्याधिकारीपंकज गोसावी, निवासी नायब तहसीलदार किसान लोहारे, महसूल नायब तहसीलदार प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here