Collector : जनतेच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Collector : जनतेच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

0
Collector : जनतेच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
Collector : जनतेच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Collector : नगर : लोकांच्या शासनाकडून (Government) असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक राहून मिशन १०० दिवस उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या. या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा आणि उद्योजकांना गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नक्की वाचा : ‘विधानसभेला ते तिन्ही पक्ष स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू,चिंता नाही’-राधाकृष्ण विखे पाटील

‘मिशन १०० दिवस’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना असलेल्या ७ कलमी कार्यक्रमांची ‘मिशन १०० दिवस’ अंतर्गत अंमलबजावणीसाठी पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, प्रत्येक विभागाने आपल्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करावी, जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळ अधिक माहितीपूर्ण आणि नागरिकांसाठी उपयुक्त करण्यावर भर द्यावा. नागरिकांना ऑनलाइन सुविधांचा जलद लाभ घेता यावा, यासाठी संकेतस्थळ नसलेल्या विभागांनी अद्ययावत संकेतस्थळांची निर्मिती करावी.

अवश्य वाचा : मोठी बातमी!पंजाबमधील आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू

तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी करण्यावर भर द्यावा (Collector)

‘इज ऑफ लिव्हिंग’ या संकल्पनेवर नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी विविध सेवांचे सुसूत्रीकरण व सरळीकरण करण्यात यावे. ‘सुंदर माझे कार्यालय’ या संकल्पनेअंतर्गत शासकीय विभागातील प्रत्येक कार्यालय स्वच्छ, सुटसुटीत, आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवावी, यासाठी कार्यालयीन अभिलेख अद्ययावत करण्यात यावे. अनावश्यक साहित्य निर्लेखित करण्यात यावे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी करण्यावर भर द्यावा, यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींचा वापर करावा. नागरिकांच्या तक्रारी व अर्जांवर सात दिवसांच्या आत निराकरण करण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

तातडीने सर्व परवाने उपलब्ध करून देण्यात येतील (Collector)

जिल्ह्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तातडीने सर्व परवाने संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येतील. उद्योजकांची कुठेही अडवणूक होणार नाही, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अहिल्यानगर जिल्हा ई-ऑफिस‌ प्रणाली राबविण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. यापुढे आपला जिल्हा सर्व विभागात ई ऑफिसची अंमलबजावणी करणारा प्रथम जिल्हा ठरला पाहिजे, यासाठी सर्व विभागांनी काम करावे, अशा सूचना ही त्यांनी दिल्या.