Collector’s Office : नगर : महाराष्ट्र (Maharashtra) राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, हॉट मिक्स असोसिएशन व ऑल इंडिया कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशन (All India Contractors Welfare Association) संघटनेच्या वतीने कंत्राटदार ठेकेदारांचे देयके देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector’s Office) धरणे आंदोलन करून निदर्शन करण्यात आले.
नक्की वाचा : महिला ग्रामसभेत दारू दुकान गावाबाहेर घेऊन जाण्याचा निर्णय
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य अभियंता संघटनेचे विभागीय अध्यक्ष समीर अमीन शेख, बिल्डर असिएशन ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष दीपक दरे, ऑल इंडिया कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष जुनेद शेख, महेश गुंदेचा, किरण पागिरे, संदीप भगत, हर्षद भोरडे, अक्षय कराड, गणेश श्रीराम, मिलिंद बोगाणे, वैष्णव मिसाळ, फैयाज शेख, रंजीत फलके, अविनाश ओहोळ, अर्षद शेख, सोमनाथ शिंदे, अभिजीत बुधवंत, भागवत दाभाडे, राहुल राख आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : शिव्या बंदीच्या शासन निर्णयासाठी सरपंच आरगडे यांचे उपोषण
कंत्राटदार व कामगार आर्थिक अडचणीत (Collector’s Office)
राज्यातील ३ लाख कंत्राटदार व त्यावर अवलंबून असणारे घटक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासनाने कंत्राटदारांचे थकीत बिले शासनाने तत्काळ द्यावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे शासनाने बिले न दिल्याने छोटे-मोठे कंत्राटदार अक्षरशः देशोधडीला लागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.